Join us

इंटीमेट सीन्स करताना काय होतात कलाकारांचे हाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 12:20 IST

काही प्रेक्षक सहज बोलूनही जातात की, कलाकारांची किती मजा असते ना!!... पण.....

मुंबई : सिनेमांमधील इंटीमेट सीन पाहून अनेकांच्या तोंडचं पाणी पळतं. काही प्रेक्षक सहज बोलूनही जातात की, कलाकारांची किती मजा असते ना!!... पण असे सीन करताना कलाकारांना कशा गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यांना काय अडचणी येतात. याचा खुलासा हॉलिवूडच्या काही कलाकारांनी केलाय. ते कलाकार हे सीन करत असताना आपल्या भावनांवर कशाप्रकारे नियंत्र ठेवत असतील? असाही प्रश्न अनेकांना पडतो. असाच एक प्रश्न काही दिवसांपूर्वी Quora या वेबसाईटवर विचारण्यात आला होता आणि यावर काही कलाकारांनी उत्तरेही दिलीत.

1) जर्मनीच्या ३९ वर्षाचा अभिनेता मायकल फसबेंडर याने सांगितले की, इंटीमेट सीन हे कठीण असतात. एक अभिनेता या नात्याने सर्वात आधी हे जाणून घ्यायला हवं की, तुम्ही परिस्थितीचा फायदा तर उठवत नाही आहात ना. सगळं काही सहज आहे, असं तुम्ही समोरच्या व्यक्तीला फिल करुन द्यायला हवं. मी असाच हलका मूड ठेवून असे सीन करतो. कारण तुम्ही टेक वर टेक नाही घेऊ शकत’.

2) २७ वर्षीय वेनीसा हुडगेंसने आपल्या ‘स्प्रिंग ब्रेकर्स’ या सिनेमात इंटीमेट सीन दिला होता. ती याबाबत म्हणते की, हा सीन माझ्यासाठी अतिशय वाईट अनुभव होता. या सीननंतर मी माझ्या एजंटला साफ सांगितलं की, मी यापुढे कधीही असे सीन्स करणार नाही’.

3) लिओनार्दो दी कॅप्रियो याने ‘वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट’ या सिनेमात असे अनेक सीन केले आहेत. त्याबाबत तो सांगतो की, जेव्हा तुम्ही अशाप्रकारे कॅरेक्टरमध्ये असता तेव्हा तुमच्यावर जबाबदारी असते की, ते भूमिकेसारखं झालं पाहिजे. त्यादरम्यान तुम्ही स्वत:बद्दल विचार करत नाही. कारण तिथे तुम्ही नसता. उलट तुम्ही एका दुस-या व्यक्तीला पडद्यावर दाखवत असता’.

4) ४१ वर्षीय अभिनेत्री एंजेलिना ज्योलीने ‘लॅंड ऑफ न्लड अ‍ॅन्ड हनी’मध्ये सेक्स सीन केला होता. एंजेलिनाने या सीनबद्दल सांगितले की, कुणालाही असे काम करण्यास जरा तरी अडचण येतेच. कारण ते रिअल लाईफ कपल नसतात. एक खोलीत एका वेगळ्याच व्यक्तीसमोर न्यूड होणं हे कुणालाही सहज वाटणार नाही. पण मला माझ्या सर्वच सहकलाकारांनी कम्फर्ट फिल दिला. कारण ती कथेची गरज आहे’.

5) ७२ वर्षीय मायकल डगलसने एका सिनेमात इंटीमेट सीन केला होता. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘इंटीमेट सीनमध्ये सर्वात अडचणीची बाब ही असते की, ते करत असताना आपल्याला सर्वजण बघत असतात. मला नाही आठवत की, मी लास्टटाईम कुणाला मारलं. त्यामुळे सर्वांना माहिती आहे की, असे सीन कसे करायचे’.

6) हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा गेर्विनने सुद्धा तिच्या एका सीनबद्दल सांगितले की, ‘मला हे माहिती होतं की, यात काही विचित्र इंटीमेट सीन्स असतील. पण ते चांगले झालेत. सर्वांनीच अतिशय चांगली कोरिओग्राफी केली होती. बेन स्टिलर हा चांगला माणूस आहे. त्याने मला विश्वास दिला आणि माझ्यासोबत काही उलट सुलट केले नाही’.

7) ४० वर्षीय कॅनेडियन अभिनेता रायन रेनॉल्ड्स याने त्याच्या ‘द चेंज अप’ या सिनेमातील सीनबद्द्ल सांगितले की, ‘‘द चेंज अप’ सिनेमातील त्या सीनमध्ये अभिनेत्री बसलेली होती आणि मी तिचा टॉप उतरवतो. यावेळी तिच्या चेह-या हसू होतं आणि मी सीनची प्रत्येक लाईन विसरलो. केवळ याच सिनेमात नाहीतर प्रत्येक सिनेमात माझ्यासोबत हेच झाले आहे’.