Join us

हॉलीवूड स्टार्स ‘भारतीय बाजारात’

By admin | Updated: October 12, 2016 03:34 IST

एक्स मॅन म्हणून परिचित असलेला ह्यू जेकमॅन हादेखील एका भारतीय मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत झळकला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा

माय नेम इज पान मसाला-‘गोल्डन आय’, ‘टूमारो नेव्हर डाइज’, ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’, ‘डाय अनादर डे’ या जेम्स बाँडच्या सुपरडुपर सीझनमध्ये स्मार्ट जेम्स बाँड साकारणारा पियर्स ब्रॉस्नन चक्क पानमसाला विकताना दिसत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर विरोधी विक्रेत्यांसाठी हा एक प्रकारचा धक्का असल्याने सध्या भारतीय बाजारपेठ गरम आहे. दरम्यान, या जाहिरातीत पियर्स ब्रॉस्नन चक्क बाँड अवतारात दिसत असल्याने प्रेक्षकांसाठी ही जाहिरात एक प्रकारची पर्वणी ठरत आहे. या पानमसाला कंपनीने पियर्स याला थेट आपल्या उत्पादनाचा ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून घोषित केल्याने भारतीय बाजारपेठेतील अर्थकारणही यानिमित्ताने समोर आले आहे.

निकोलची वादग्रस्त जाहिरात-हॉलीवूड अभिनेत्री निकोल किडमॅन हिनेदेखील हॉलीवूडच्या सीमा पार करीत संयुक्त अरब अमिरातच्या एतिहाद एअरवेजच्या जाहिरातीत काम केले. परंतु या जाहिरातीनंतर तिला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. एतिहाद एअरवेजला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे निकोलने आंतरराष्ट्रीय महिला दिनी जाहीर केले होत. नेमका हाच मुद्दा उपस्थित करीत असोसिएशन आॅफ प्रोफेशनल फ्लाइट अटेंडंट्सने (एपीएफए) निकोलवर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, जाहिरातीत निकोलने एतिहाद एअरवेजमध्ये असलेल्या सोयी-सुविधांचे प्रमोशन केले होते.

जेकमॅनकडून मोबाइलचे ब्रँडिंग-एक्स मॅन म्हणून परिचित असलेला ह्यू जेकमॅन हादेखील एका भारतीय मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत झळकला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जबरा फॅन असलेल्या ह्यू जेकमॅनला भारताप्रति नेहमीच आकर्षण राहिले आहे. या आकर्षणापोटी त्याने मायक्रोमॅक्स या भारतीय मोबाइल कंपनीच्या एका जाहिरातीत काम केले होते. जाहिरातीत त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अ‍ॅक्शन त्याने केल्याने प्रेक्षकांनी त्या वेळेस त्याला भरपूर पसंतीही दिली होती. एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवल्यानंतर ह्यू जेकमॅन मोबाइलच्या साहाय्याने स्वत:ची सुटका करताना विरोधकांना कशा पद्धतीने धोबीपछाड देतो, हे जाहिरातीत दाखविण्यात आले होते.