Join us
Daily Top 2Weekly Top 5

हाऊसफुल! 'झिम्मा २' पाहायला सिनेमागृहांत बायकांची गर्दी, हेमंत ढोमेने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 17:49 IST

...अन् बायकांनी थिएटर खच्चाखच भरलं! 'झिम्मा २' होतोय हाऊसफुल, हेमंत ढोमेने शेअर केला व्हिडिओ

सध्या जिकडेतिकडे 'झिम्मा २' या मराठी चित्रपटाची चर्चा आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' सिनेमाचा हा सीक्वेल आहे. हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेल्या 'झिम्मा २'च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. अखेर शुक्रवारी(२४ नोव्हेंबर) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. झिम्मा २ प्रदर्शित होण्याआधीच त्याची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत होती. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. तर सिनेमातील गाणीही हिट ठरली. 'झिम्मा २'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आता प्रदर्शनानंतर 'झिम्मा २'चे शो हाऊसफुल होत आहेत. 

सात महिल्यांच्या रियुनियनची गोष्ट सांगणारा 'झिम्मा २' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करताना दिसत आहेत. खासकरुन महिलावर्गाच्या हा सिनेमा पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. ठिकठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफुल झालेले दिसत आहेत. हेमंत ढोमेने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'झिम्मा २' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. 'झिम्मा २'च्या संपूर्ण टीमने हाऊसफुल झालेल्य या शोला हजेरी लावत प्रेक्षकांना सरप्राइज दिलं होतं. 

हेमंत ढोमेने शेअर केलेल्या या व्हिडिओत सिनेमागृह महिलांनी हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळतं. 'झिम्मा २'च्या कलाकारांनी थिएटरमधल्या प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना इंदुताईची स्टेपही करायला सांगितल्याचं व्हिडिओत दिसत आहे. 

'झिम्मा २'मध्ये सिद्धार्थ चांदेकर, सायजी संजीव, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्याच दिवशी 'झिम्मा २' ने बॉक्स ऑफिसवर १.२० कोटींची कमाई केली आहे. आता हेमंत ढोमेचा 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देणार का? हे पाहावं लागेल. 

टॅग्स :मराठी चित्रपटसिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी