Join us  

 करिनाच्या लाडक्या जेहचा हा VIDEO पाहिलात का? कॅमेरा बघताच केलं असं काही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 12:11 PM

Kareena Kapoor Khan Son Jeh Ali Khan: आता तैमूरचा लहान भाऊ जहांगीर अर्थात जेह याचीही चर्चा रंगू लागली आहे. तैमूर दिसला की कॅमेरे चमकायचे, अगदी तसेच जेह दिसला की, कॅमेऱ्यांची गर्दी होतेय.

Kareena Kapoor Khan Son Jeh Ali Khan: सैफ अली खान (Saif Ali Khan) व करिना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) मोठा मुलगा तैमूर अली खानचं (Taimur Ali Khan) स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर अगदी जन्मापासूनच लाईमलाईटमध्ये आला. आजही त्याचा व्हिडीओ वा फोटो पडला रे पडला की, सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल होतो.  अनेक लोक तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण यामुळे तैमूरची लोकप्रियता कमी झाली नाही. आता तैमूरचा लहान भाऊ जहांगीर अर्थात जेह याचीही चर्चा रंगू लागली आहे. तैमूर दिसला की कॅमेरे चमकायचे, अगदी तसेच जेह दिसला की, कॅमेऱ्यांची गर्दी होतेय. त्याचे एक ना अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  नुकतंच जेहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये जेह कुतूहलाने पापाराझी आणि कॅमेऱ्याला पाहण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे.

व्हिडीओत जेह रेड शॉर्ट्स, व्हाईट टी-शर्ट आणि यॅलरे क्रॉक्स घालून दिसतोय. नॅनी त्याचा हात पकडून त्याला सोबत घेऊन जातेय. पण अचानक जेहची नजर पापाराझींवर पडते आणि फोटोग्राफर्सचा ग्रूप पाहून तो नॅनीचा हात सोडून त्यांच्यादिशेने पळ काढतो. नॅनी त्याचा हात पकडून त्याला आत नेण्याचा प्रयत्न करते. मात्र जेह इतका उत्सुक दिसतो की तो स्वत: चा हात सोडवून पापाराझींकडे जाण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व मजेशीर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

  एकीकडे तैमूर आता कॅमेरा पाहून पळून जातो. त्याला जास्त फोटो काढायला आवडत नाही. तर दुसरीकडे जेह कॅमेºयाला पाहून उत्सुक होताना दिसत आहे. 

  जेहचा हा गोड व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि मजेशीर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘जेह मीडिया फ्रेंडली आहे आणि त्याला कदाचित इंटरव्ह्यू द्यायची इच्छा आहे. तर काहींनी जेहला क्युट बेबी म्हटलं आहे. तर अनेकांनी त्याला कॅमेºयाबाबत कुतूहल वाटत असल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुरबॉलिवूड