Join us

‘बँग बँग’मधून हृतिक साधणार ‘हॅट्ट्रिक’

By admin | Updated: September 29, 2014 06:18 IST

येत्या दोन आॅक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘बँगबँग’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता हृतिक रोशनने सर्वस्व पणाला लावले आहे

येत्या दोन आॅक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘बँगबँग’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता हृतिक रोशनने सर्वस्व पणाला लावले आहे. या चित्रपटासाठी हृतिकने ३० कोटी रुपये फी म्हणून आकारली आहे. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट व्हावा, यासाठी तो प्रयत्नशील आहे. ‘अग्निपथ’ आणि ‘क्रिश-३’ या हृतिकच्या रिलीज झालेल्या चित्रपटांनी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. ‘बँगबँग’ला फक्त शंभर कोटी रुपयांची कमाई करून चालणार नाही, कारण या चित्रपटाचे बजेटच १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. ‘क्रिश ३’ने २४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.