Join us  

'हेट स्टोरी 3' फेम अभिनेत्रीचं मराठी कलाविश्वात पदार्पण; ‘दगडी चाळ 2'मध्ये दिसणार बोल्ड अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 5:51 PM

Daisy shah: गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकारांचा मराठी कलाविश्वाकडे येण्याचा ओघ वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार मराठी कलाविश्वात झळकले आहेत.

अंकुश चौधरी (Ankush Choudhary) आणि पूजा सावंत (pooja sawant) यांची मुख्य भूमिका असलेला दगडी चाळ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळेच 'दगडी चाळ 2'  (Daagdi Chaawl 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सूर्या आणि सोनल यांच्या आयुष्यातील पुढील प्रवासावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे.

गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकारांचा मराठी कलाविश्वाकडे येण्याचा ओघ वाढला आहे.  त्यामुळे आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार मराठी कलाविश्वात झळकले आहेत. यामध्येच आता 'हेट स्टोरी 3', 'जय हो' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली डेझी शाह (daisy shah) 'दगडी चाळ 2' मध्ये झळकणार आहे.

'दगडी चाळ 2' मधील 'राघू पिंजऱ्यात आला' (raghu pinj ryat ala)  हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून या गाण्यात डेझी शाह थिरकत असल्याचं पाहायला मिळतं. डेझीचा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्यामुळे तिच्यासह चाहत्यांनाही तिला या चित्रपटात पाहण्याची उत्सुकता आहे.

दरम्यान, 'दगडी चाळ 2' मध्ये अंकुश, पूजा आणि मकरंद देशपांडे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणते कलाकार झळकणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, एक एक करत प्रत्येक भूमिकेवरील पडदा दूर करण्यात येत आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, चंद्रकांत कणसे यांनी दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट  येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :डेझी शहासिनेमासेलिब्रिटीअंकुश चौधरीपूजा सावंत