Join us  

Riya Sen: एक चूक अन् बर्बाद झालं रिया सेनचं करिअर, बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर जगतं असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 1:57 PM

1991 मध्ये बालकलाकार (Child Actress) म्हणून रियाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रिया नेहमीच तिच्या चित्रपटांमधील बोल्ड आणि हॉट सीन्ससाठी चर्चेत असते.

Happy Birthday Riya Sen: बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने काही वर्षांपूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतून गायब झाली आहे. ती शेवटची 2017 मध्ये 'लोनली गर्ल' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. अभिनेत्री 42 वर्षांची झाली आहे आणि आज म्हणजेच 24 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. रियाने 1991 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रिया ही देव वर्मा आणि मुनमुन सेन यांची मुलगी आहे. ती अभिनेत्री रायमा सेनची धाकटी बहीण देखील आहे. रिया सेन त्रिपुराच्या राजघराण्यातील आहे.

रियाला पहिली ओळख फाल्गुनी पाठकच्या 'चुडी जो खानकी हाथ में' या गाण्यातून मिळाली. स्टार किड असूनही रिया यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकली नाही. रिया नेहमीच तिच्या चित्रपटांमधील बोल्ड आणि हॉट सीन्ससाठी चर्चेत असते. आता रिया पूर्णपणे बंगाली चित्रपटांकडे वळली आहे.रिया तिच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत राहिली. रिया सेनला बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन असेही म्हटले जाते. ती तिच्या अभिनय आणि चित्रपटांसाठी कमी, पण वादांसाठी जास्त ओळखली जाते. रिया सेनने 2017 मध्ये तिचा प्रियकर शिवम तिवारीसोबत एका खाजगी समारंभात लग्न केले.

रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे तिचा अभिनेता अश्मित पटेलसोबतचा एमएमएस लीक झाला. या व्हिडिओमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसले होते. 2005 मध्ये रिया आणि अश्मित रिलेशनशिपमध्ये होते. त्यादरम्यान रियाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. प्रसिद्धीसाठी रियानेच हा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप लोकांनी केला होता. मात्र दोघांनीही हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले होते.

बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त रिया सेन वेब सीरिजकडेही वळली आहे. ती 'जहर', 'मिसमॅच 2', 'पति पत्नी और वो' सारख्या वेब शोमध्ये दिसली आहे. रिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो-व्हिडिओ शेअर करून अभिनेत्री चर्चेत राहते. वयाच्या 42 व्या वर्षी त्याच्या फिटनेसचे उत्तर नाही. 

टॅग्स :रिया सेनसेलिब्रिटी