Join us  

बर्थ डे स्पेशल : ... आणि नर्गीस दत्त यांची ही इच्छा राहिली अपुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 11:25 AM

सुनील दत्त यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. संजय दत्त याच्यावर त्यांचा फार जीव होता. चला जाणून घेऊया त्यांच्या काही खास गोष्टी....

मुंबई : बॉलिवूडच्या सर्वात गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नर्गीस दत्त या होत्या. नर्गीस यांचा जन्म 1 जून 1929 मध्ये झाला होता. नर्गीस यांच्या आई जद्दनबाई यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांच्याकडून नर्गीस यांना सिनेमामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. नर्गीस यांचं खरं नाव फातिमा राशिद असं होतं. त्यांचे वडील डॉक्टर होते. राज कपूर यांच्यापासून वेगळ्या झाल्यानंतर त्यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. संजय दत्त याच्यावर त्यांचा फार जीव होता. चला जाणून घेऊया त्यांच्या काही खास गोष्टी....

संजयसोबतचं नातं

नर्गीस आणि संजय दत्त यांच्यात फार जवळीकता होती. संजय दत्तला जेव्हा नशेची सवय लागली तेव्हा सर्वातआधी नर्गीस यांना हे कळाले होते. नर्गीस जेव्हा अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत होत्या तेव्हा त्या तेथूनच मुलाची काळजी घ्यायच्या. 

संजय दत्तसाठी पाठवलं रेकॉर्डिंग

जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा त्यांनी संजय दत्तसाठी एक टेप रेकॉर्ड करुन पाठवली होती. त्यावेळी ती टेप ऐकून संजय रडला नाही. पण नंतर तीन वर्षांनी तीच टेप ऐकून तो जोरजोरात रडला. संजय दत्तला या टेप त्याच्या वडिलांकडे मिळाल्या तेव्हा त्यात काय आहे हे त्याला माहीत नव्हतं. त्याने ते टेप लावल्या तेव्हा घरात नर्गीस यांचा आवाज आला. त्यानंतर संजय दत्त पुढील 4 तास सतत रडत होता. 

अपूर्ण राहिली ही इच्छा

लग्न आणि मुलांनंतर नर्गीस दत्त यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतलं होतं. त्या राज्यसभा सदस्याही होत्या. पण अचानक त्या कॅन्सरच्या कचाट्यात आल्या आणि त्यांच्या जीवनातील आनंद हरपला. कॅन्सरवर उपचार घेऊन जेव्हा त्या परदेशातून परत आल्या तेव्हा त्यांची पुन्हा तब्येत बिघडली आणि त्या कोमात गेल्या. त्यांना संजय दत्त याला सिल्वर स्क्रिनवर बघायचं होतं. पण दुर्दैवाने त्यांना संजयला रुपेरी पडद्यावर बघता आले नाही. कारण रॉकी रिलीज होण्याच्या 4 दिवस आधीच त्यांचं निधन झालं होतं.

टॅग्स :नर्गिससंजय दत्त