Join us

हॅप्पी बर्थ डे मनोजकुमार

By admin | Updated: July 24, 2016 12:53 IST

आज हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून भारतमातेचे गुणगान करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांचा वाढदिवस.

संजीव वेलणकर 

पुणे, दि. २४ - आज हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून भारतमातेचे गुणगान करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांचा वाढदिवस. २४ जुलै १९३७ रोजी त्यांचा जन्म झाला. मनोजकुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी आहे. अभिनेते दिलीपकुमार यांचा त्यांच्यावर सखोल प्रभाव होता. इतका की १९४९ मध्ये चित्रपट "शबनम'मध्ये ज्या दिलीप कुमारने मनोजकुमारचे पात्र साकारले होते, त्यामुळेच त्यांना ओळख मिळवून दिली. 
त्यांनी नाव बदलून मनोजकुमार असे ठेवले. त्यांनी सन १९५७ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या “शहीद’ या चित्रपटाने मोठी लोकप्रियता मिळवली. “उपकार’ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. मनोजकुमार यांनी अनेक देशभक्तीधपर चित्रपटांची निर्मितीही केली. त्यामुळे ते “भारतकुमार’ या टोपण नावानेही ओळखले जातात. उपकार, पूरब और पश्चिीम, रोटी, कपडा और मकान, क्रांती, वो कौन थी हे चित्रपट मनोजकुमार यांचे गाजलेले आहेत. 
मनोजकुमार यांचे हरियाली और रास्ता, वह कौन थी, हिमालय की गोद में, उपकार, दो बदन, पत्थर के सनम, पूरब और पश्चिपम, रोटी, कपडा और मकान आणि क्रांती हे चित्रपट विशेष गाजले. देशभक्तीदपर आधारित चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. उपकार या चित्रपटासाठी मनोजकुमार यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. १९९२ मध्ये त्यांना “पद्मश्री’ देऊन गौरविण्यांत आले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
हरिकिशनचा मनोज बनलेल्या व्यक्तीचा "भारतकुमार ' कसा झाला याचा किस्सा. मनोजकुमार यांचा "शहीद' चित्रपट १९६५ मध्ये आला होता. त्यात त्यांनी शहीद -ए- आझम भगतसिंग यांचे पात्र साकारले होते. वास्तव आयुष्यात ते भगतसिंग पासून खूप प्रभावित आहेत. हा चित्रपट तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी पाहिला होता. त्या काळात पंतप्रधान शास्त्रींनी देशाला "जय जवान- जय किसान'चा नारा दिला होता. तो नारा ते देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवू इच्छित होते. त्यासाठी चित्रपटापेक्षा चांगले माध्यम दुसरे कुठले होते? त्यामुळे त्यांनी मनोजकुमार यांना सल्ला दिला की हा नारा केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती फिरणारा एक चित्रपट तयार करावा. 
त्यातून मनोजकुमार यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट साकारला. तो होता "उपकार'(१९६७). त्यात त्यांनी गावातील युवक "भारत'चे पात्र साकारले होते. व्यवसायाने शेतकरी होता. परंतु १९६५ मध्ये शत्रूने जेव्हा देशावर हल्ला केला तेव्हा तो सीमेवर मोर्चा सांभाळणाऱ्या जवानाच्या भूमिकेतही दिसला. शास्त्रींना जे अपेक्षित होते ते साध्य झाले होते. परंतु त्याच वेळी मनोजकुमार यांना एक उद्देशही मिळाला. देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून ते स्वत:चे विचार प्रकट करण्याचा. तेव्हा सुरू झालेला सिलसिला आजपण कायम आहे. आपल्या समुहातर्फे  मा.मनोजकुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 
मा.मनोजकुमार यांची काही गाणी
मै ना भूलुंगा
मेरे देस की धरती
पूरवा सुहानी आई रे
कोई जब तुम्हारा
मेरे देश की धरती
दुल्हन चली