Join us

‘हाफ गर्लफ्रेंड’ जोडीचे फोटोसेशन

By admin | Updated: April 18, 2016 00:53 IST

दिग्दर्शक मोहित सुरी यांचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’चे स्टारकास्ट अखेर ठरले. श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यासह चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार

दिग्दर्शक मोहित सुरी यांचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’चे स्टारकास्ट अखेर ठरले. श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यासह चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मात्र, चित्रपट २८ एप्रिलला पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या दोघांनी चित्रपटासाठी फोटोसेशन केले. मे २०१६मध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होईल. अर्जुन म्हणाला, ‘मी मे मध्ये शूटिंग सुरू करणार आहे. आणि सप्टेंबरमध्ये शूटिंग संपवणार आहोत. माझ्यासोबत सध्या माझे संपूर्ण शेड्युल नाहीये. कारण या वर्षीच चित्रपटाची शूटिंग संपायला हवी. न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाची शूटिंग आम्हाला करायची आहे.’ ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाची निर्मिती मोहित सुरी आणि चेतन भगत करणार आहे.