Join us

‘इफ्फी’त झळकणार हलाल

By admin | Updated: October 21, 2016 03:35 IST

मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. अनेक मराठी चित्रपट परदेशात प्रदर्शित होऊ लागले आहेत. कान्स फेस्टिव्हल, पुणे महोत्सव

मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. अनेक मराठी चित्रपट परदेशात प्रदर्शित होऊ लागले आहेत. कान्स फेस्टिव्हल, पुणे महोत्सव, गोवा महोत्सव यांसारख्या विविध महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणारा तसेच राज्य पुरस्कारांमध्ये गौरविण्यात आलेला हलाल सिनेमा आता 'इफ्फी'तही झळकणार आहे. गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया) होत आहे. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हलाल या सिनेमाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या वर्षापासून मराठी चित्रपट पाठवण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. यंदा याच धर्तीवर गोवा येथे होणाऱ्या ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी १० चित्रपट निवडण्यात आले आहेत. हलाल चित्रपट मुस्लिम समाजातील रितिरीवाज आणि विवाहसंस्थेवर भाष्य करतो. तर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील हलालची स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. हलाल हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. आता 'इफ्फी'त ही हलाल आपला ठसा उमटवेल का, हे आपल्याला लवकरच समजेल.