Join us  

शो मस्ट गो ऑन अभिनेत्री सेहरिश अलीने दुखापतीनंतर केले शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 7:15 AM

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेने आठवड्यांमागून आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्यांची मनेही जिंकली आहेत.

ठळक मुद्देएका अपघातात सेहरिशच्या पाठीला जोरदार मार बसला

झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेने आठवड्यांमागून आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्यांची मनेही जिंकली आहेत. मालिकेची कथा पुढे सरकत सली, तरी अभिनेत्री सेहरिश अली हिच्या जीवनात काही चांगली गोष्ट घडत नाहीये, असे दिसते. अलीकडेच एका प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी एका अपघातात सेहरिशच्या पाठीला जोरदार मार बसला.

मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना दिसेल की दुर्गा (श्वेता महाडिक) ही कुटुंबाचे सर्व सदस्य असलेल्या एका खोलीत अडकलेली असून त्या खोलीला आग लागली आहे. कुटुंबाचे सदस्य तिला वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. यावेळी लक्ष्मी (सेहरिश अली) ही सर्वप्रथम त्या खोलीकडे धाव घेते आणि सर्व कुटुंबियांना सूचना देते. या प्रसंगाचे चित्रीकरण करीत असताना सेहरिश जमिनवीवर पडलेल्या पाण्यावरून पाय सरकून खाली आदळली आणि त्यामुळे तिची पाठ व हाताचे कोपर यांना जोरदार मार बसला, तर तिचा पायही मुरगळला. या अपघातामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले आणि तात्काळ एका डॉक्टरला पाचारण करण्यात आले.

सर्व सहकलाकार आणि कर्मचारी हे सेहरिशच्या मदतीला लगेचच धावून गेले होते. डॉक्टरांनी तिला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला सला, तरी एक व्यावसायिक अभिनेत्री असल्याने सेहरिश थोड्या वेळानंतर पुन्हा सेटवर आली आणि तिने चित्रीकरणात भाग घेतला. या घटनेसंदर्भात तिने सांगितले, “त्या दिवसाचं आमचं काम संपतच आलं होतं. त्यामुळे आम्ही सर्वजण तो प्रसंग लवकर संपविण्याच्या प्रयत्नात होतो. पण या घाईत माझा पाय जमिनीवरच्या पाण्यावरून घसरला आणि मी पाठीवर आदळले. या दणक्यामुळे मला वेदना नक्कीच झाल्या; पण मी आमच्या टीमची आभारी आहे, कारण त्यांनी तात्काळ एका डॉक्टरला सेटवर आणलं आणि माझ्यावर उपचार केले. मला आता उठताच येणार नाही, असं मला वाटत होतं, पण मी हळूहळू उठून बसले. पण त्याक्षणी माझ्या मनात त्या प्रसंगाचं अर्धवट राहिलेलं चित्रीकरण इतकाच विचार होता. त्यामुळे माझ्या त्या अखेरच्या प्रसंगाचं चित्रीकरण पूर्ण करण्याचा मी निर्णय घेतला. पण इतक्या उत्तम आणि मदतीला सदैव तत्पर असलेल्या टीमबरोबर काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते.” 

टॅग्स :गुड्डन तुमसे ना हो पायेगाझी टीव्ही