Join us

आॅक्टोबरमध्ये स्पृहा देणार गूड न्यूज

By admin | Updated: October 4, 2015 22:03 IST

स्पृहा जोशीकडे एक गूड न्यूज आहे. पण बाळ जन्माला येण्याची नाही बरं का! झालात ना जरा कन्फ्युज. अहो, आपल्या लाडक्या सोज्वळ, सुंदर, हुशार स्पृहा जोशीचा येत्या १३ आॅक्टोबरला ‘हॅपीवाला’ बर्थडे आहे

स्पृहा जोशीकडे एक गूड न्यूज आहे. पण बाळ जन्माला येण्याची नाही बरं का! झालात ना जरा कन्फ्युज. अहो, आपल्या लाडक्या सोज्वळ, सुंदर, हुशार स्पृहा जोशीचा येत्या १३ आॅक्टोबरला ‘हॅपीवाला’ बर्थडे आहे. तिच्या वाढदिवसाची केवळ तिलाच नव्हे, तर ‘फॅन्स’लाही तितकीच उत्सुकता आहे. कारण तिनेच सोशल मीडियावर 'october, my birthday month, coming with many surprises, Announcements’ अशी पोस्ट टाकली आहे. ‘अग्निहोत्र’ ते ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’पर्यंतच्या तिच्या प्रवासानंतर करिअरला वेगळी दिशा देऊन उंच झेप घेण्यासाठी आता ती सज्ज झाली आहे. स्पृहाने यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत आपले स्थान कमावले आहे आणि प्रत्येक नवीन गोष्टींमध्ये तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. अभिनयाबरोबरच कवयित्री आणि गीतकार म्हणूनदेखील तिची ओळख निर्माण झाली आहे. आता नवीन काय करणार, याची उत्सुकता तिच्या फॅन्सला लागली आहे.