ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ - दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच गोलमाल चा चौथा भागही घेऊन येतो आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेतील अभिनेत्री कोण असणार? हा मुद्दा ऐरणीचा विषय बनला होता. प्रथम करिना कपूर खान नंतर श्रद्धा कपूर यांच्या नावांची वर्णी लागली होती. पण आता मात्र तिसरेच नाव समोर आले आहे. ते म्हणजे बॉलिवूडची जानेमन गर्ल परिणीती चोप्रा. चित्रपटात परिणीतीची भूमिका ही बबली गर्लप्रमाणे असणार असल्याने खासकरून तिची निवड करण्यात आल्याचे कळते आहे. चित्रपटाच्या पटकथेवर रोहित शेट्टी सध्या काम करत आहेत. २०१७ च्या दिवाळीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मेरी प्यारी बिंदू आणि ताकादुम या चित्रपटांमध्ये परिणीती सध्या काम करत आहे. रोहित शेट्टी परिणीती चोप्रा आणि श्रद्धा कपूर यांपैकी एका अभिनेत्रीची निवड करायची म्हणून गोंधळात पडला होता. पण, परीचा चित्रपटाच्या बाबतीतील उत्साह पाहून तिला या चित्रपटासाठी निवडणेच निश्चित केले आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या चौकडीने प्रेक्षकांना भरपूर हसविले. आता पुन्हा एकदा चाहत्यांना लोटपट करण्यास ते सज्ज झाले आहेत.
गोलमाल ४ मध्ये या अभिनेत्रीची लागली वर्णी
By admin | Updated: November 15, 2016 17:59 IST