Join us  

"तू सुंदर दिसत नाहीस, मेकअप करून ये", ऑडिशनला गेलेल्या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 5:13 PM

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीला एकेकाळी मिळालेला नकार, म्हणाली, "त्यांनी मला..."

आयेशा सिंह हा टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा आहे. 'गुम है किसी के प्यार मे' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या सई या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पहिल्याच मालिकेमुळे आयेशा प्रसिद्धीझोतात आली. पण, कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करणं आयेशासाठी एवढं सोपं नव्हतं. तिला या काळात अनेक नकार पचवावे लागले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला. 

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत आयेशाने एका ऑडिशनचा प्रसंग सांगितला. आयेशा म्हणाली, "मी एका मोठ्या प्रोडक्शन कंपनीत ऑडिशन द्यायला गेले होते. मला पाहून ते म्हणाले की तू सुंदर दिसत नाहीस, मेकअप करुन ये, मग आपण बोलू. यामुळे मी हताश झाले होते. मी माझ्या एका बहिणीच्या संपर्कातून त्या ऑडिशनसाठी गेले होते. नंतर मी माझ्या बहिणीली खूप ओरडले. त्यानंतर मग मी थोडा फार मेकअप करायला शिकले. पण, मला वाटतं की तुमचा मेकअप जेवढा कमी असेल, तेवढे प्रेक्षकांना तुम्ही जवळचे वाटाल." 

आयेशा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करताना दिसते. 'गुम है किसी के प्यार में' मालिकेमुळे आयेशाच्या चाहत्या वर्गात भर पडली. सोशल मीडियावरही तिचं प्रचंड मोठं फॅन फॉलोविंग आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्लस