Join us  

होय, मी मुस्लिम आणि कोणीही आम्हाला...; गौहर खान का भडकली?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 4:54 PM

Gauhar Khan : धर्मामुळे कुशल टंडनसोबत ब्रेकअप केलं म्हणणाऱ्याला गौहर खानचं सणसणीत उत्तर

‘बिग बॉस’च्या घरात अनेक जोड्या बनतात आणि शो संपला की तुटतात. असंच एक जोडपं म्हणजे गौहर खान (Gauhar Khan) व कुशाल टंडन (Kushal Tandon) यांचं. गौहरचं आताश: लग्न झालंय. तिच्या संसारात ती आनंदी आहे. पण एकेकाळी गौहर व कुशाल यांचं अफेअर चांगलंच गाजलं होतं. आताही हे दोघं चर्चेत आहेत. होय, गेल्या काही दिवसांपासून कुशालवरून गौहरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. 

कुशाल व गौहरच्या ब्रेकअपचं खरं कारण धर्म आहे. गौहरनं कुशालवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला. कुशलने ते अमान्य केलं आणि म्हणून दोघांचं ब्रेकअप झालं, असा आरोप करत काही लोकांनी गौहरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एका युजरने असाच आरोप करत गौहरला ट्रोल केलं. मग काय तिनं त्याला चांगलंच सुनावलं.

हे लूजर, मी मुस्लिम आहे आणि कोणीही आम्हाला आमच्या अधिकारांपासून वंचित ठेवू शकत नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे लोकशाही आहे. तुला वाटते तशी हुकूमशाही इथे चालत नाही. त्यामुळे तू तुझ्या अमेरिकन स्टेट्समध्ये राहा आणि आमच्या देशात द्वेष पसरवणं बंद कर,’अशा शब्दांत गौहरने एका ट्रोलरचा क्लास घेतला.

कुशाल व गौहर हे दोघेही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉस 7च्या घरातच त्यांच्यात प्रेम बहरलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही काही काळ हे प्रेम कायम होतं. मात्र अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. काही कारणास्तव दोघेही एकमेकांपासून दूर झाले होते.  पुढे दोघांनीही आपआपला मार्ग निवडला आणि आपल्या कामात  बिझी झालेत.  25 डिसेंबर 2020 रोजी गौहरने कोरिओग्राफर जैद दरबारसोबत लग्न केलं. सध्या ती तिच्या संसारात आनंदी आहे. 

टॅग्स :गौहर खान