पडद्यामागे अनेक अभिनेते-अभिनेत्रींना नृत्य शिकवणारा प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. दिग्दर्शक अजय चांढोक यांच्या ‘हे ब्रो’ चित्रपटाची निर्मिती गणेशची पत्नी विधी आचार्य हिने केली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला चित्रपटगृहात झळकणाऱ्या या चित्रपटात मनिंदर आणि नूपुर शर्मा यांच्यासह गणेश मुख्य भूमिकेत असेल. नेहमी पडद्यामागे राहून गणेशची कोरिओग्राफी चित्रपटात जान आणते. आता या सिनेमात त्याचा अभिनय प्रेक्षकांना कितपत रुचेल ते लवकरच कळेल.
गणेशही करणार अभिनय
By admin | Updated: January 19, 2015 11:00 IST