Join us

गणेशोत्सवासाठी ‘उठे कल्लोळ कल्लोळ’

By admin | Updated: January 4, 2016 02:22 IST

दर वर्षी गणेशोत्सवात नवनवीन गाणी ऐकायला मिळत असतात. त्या-त्या वर्षी फेमस होणारी, तर काही पूर्वीपासून चालत आलेली गाणीही त्यामध्ये ऐकायला मिळत असतात.

दर वर्षी गणेशोत्सवात नवनवीन गाणी ऐकायला मिळत असतात. त्या-त्या वर्षी फेमस होणारी, तर काही पूर्वीपासून चालत आलेली गाणीही त्यामध्ये ऐकायला मिळत असतात. दर वर्षी गणेशोत्सव दाखविणारे एक तरी गाणे कोणत्या ना कोणत्या चित्रपटात पाहायला मिळते. यामध्ये आता अजून एका गाण्याची भर पडली आहे. ‘बंध नायलॉनचे’ चित्रपटात ‘उठे कल्लोळ कल्लोळ’ हे गाणे पाहायला मिळणार आहे. हे गाणे अमितराज यांनी संगीतबद्ध केले असून, आदर्श शिंदे यांनी गायले असून, मंदार चोळकर यांनी ते लिहिले आहे. हा चित्रपट एकीकडे कुटुंबाला बांधून ठेवतो, तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या कारणांवरून कु टुंबात वाद निर्माण होतात आणि घर तुटण्यापर्यंत ते टोकाला जातात. त्यात हे तंत्रज्ञानी जग या नात्यांवर कसे चांगला-वाईट परिणाम करते, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट जतिन वागळे यांनी दिग्दर्शित केला आहे. सुनील नायर चित्रपटाची निर्मिती करीत असून, झिरो प्रायव्हेट लिमिटेड आणि मट्रुका मोशन पिक्चर्स तो सादर करणार आहेत. या चित्रपटात महेश मांजरेकर, सुबोध भावे, मेधा मांजरेकर, श्रुती मराठे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर आणि प्रांजल परब आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.