Join us  

मैत्रीच्या पलीकडचं नातं सांगणारा ‘Friends’

By admin | Published: January 13, 2016 2:37 AM

मैंत्री हे नातं असं असतं, की त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. कारण हे नातं सगळ्या रक्ताच्या नात्यांच्याही पलीकडचं असतं. कोणत्याही संकटात मदत करणारं,

मैंत्री हे नातं असं असतं, की त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. कारण हे नातं सगळ्या रक्ताच्या नात्यांच्याही पलीकडचं असतं. कोणत्याही संकटात मदत करणारं, रडणाऱ्याला हसवणारं, वेळ पडलीच तर हक्काने दोन कानाखाली मारणारं, स्वत:पेक्षाही पहिल्यांदा दोस्ताचा विचार करणारं आणि दुसऱ्यासाठी अगदी मरणही पत्करणारं. अशा दोस्तीच्या गोष्टी सांगणारे चित्रपट बॉलीवूडमध्ये अनेक. शोले चित्रपट तर खास करून त्यासाठीच फेमस झाला आणि आजही जय-वीरूच्या या दोस्तीचे गोडवे गायले जातात. त्यानंतरही मित्रांच्या कट्ट्यांचे, मस्तीचे किस्से दाखवणारे याराना, स्टाईल, रंग दे बसंती यांसारखे बरेच चित्रपट तयार झाले. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त दोन मित्रांची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखवणारे चित्रपट जवळपास नगण्यच. १९४१मध्ये दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा ‘शेजारी’ हा चित्रपट विशेष गाजला होता. त्यातील लख लख चंदेरी तेजाची... हे गाणं तर आजही अनेक कार्यक्रमांमध्ये गायलं जातं. मात्र त्यानंतर मराठीत एकही चित्रपट असा झाला नाही, जो फक्त दोन मित्रांमधील मैत्री दाखवेल. पण आता आपली प्रतीक्षा संपली आहे. कारण दाक्षिणात्य दिग्दर्शक आर. मधेश घेऊन येत आहेत सचित पाटील आणि स्वप्निल जोशी या दोघांची मैत्री ‘Friends’ या चित्रपटातून. हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच १५ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त ‘Friends’ चित्रपटातील अभिनेता स्वप्नील जोशी, सचित पाटील, अभिनेत्री गौरी नलावडे, गायिका जान्हवी प्रभू-अरोरा व सहनिर्माते गौरव पवार यांनी ‘लोकमत’ला भेट दिली.सध्या असा एक टे्रंड येत आहे, की एका चित्रपटातील गाण्यांसाठी अनेक संगीतकार आणि गायकांना संधी दिली जाते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गायक-संगीतकारांच्या स्टाईलचा, त्यांच्यातील कलागुणांचा मिळून एक वेगळाच फ्लेवर चित्रपटाला येतो. या चित्रपटात मी मन पाखरू हे गाणं गायलं असून मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलं असून, नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलं आहे.- जान्हवी प्रभू-अरोरा, गायिकाया चित्रपटामुळे मराठी चित्रपटांचा आलेख अजूनच उंचावेल असा मला विश्वास वाटतो. कारण दिग्दर्शक दाक्षिणात्य असल्याने त्यांनी साऊथमधील चित्रपटांसारखाच हा चित्रपटही भव्य पद्धतीने मांडला आहे.- गौरव पवार, सहनिर्मातेस्वप्नील आणि माझ्यातील मैत्री ही केवळ चित्रपटातच नसून त्याआधीपासूनची आहे. त्यामुळे आपल्या दोघांचा एखादा तरी चित्रपट असावा असं आम्हाला दोघांनाही नेहमी वाटायचं. पण आम्ही हेदेखील ठरवलं होतं की आपल्या दोघांचा जो कोणता पहिला चित्रपट असेल तो मोठा आणि जरा हटके विषयावर असला पाहिजे. या चित्रपटात आम्ही दोघेही आहोत आणि दोन मित्रांमधील मैत्री हा विषयदेखील हटके आहे.- स्वप्नील जोशी, अभिनेतामैत्री हे सगळ्या नात्यांच्या पलीकडचं नातं आहे. आई-वडील, बहीण-भाऊ, नवरा-बायको ही सगळी नाती त्या त्या जागी त्यांचं महत्त्व सांगतात. पण मैत्री या नात्यात आपल्या मनात जे काही आहे ते सगळं तुम्ही समोरच्याला बिनदिक्कतपणे सांगू शकता. कारण त्याला आपण पूर्ण विश्वासाने एखादी गोष्ट सांगू शकतो आणि आपल्यात काही कमतरता असेल तर तो मित्र किंवा मैत्रीण ती कमतरता दूर करण्यासाठी मदत करतात. अशीच मैत्री या चित्रपटातही पाहायला मिळेल. - सचित पाटील, अभिनेतामाझा हा पहिलाच चित्रपट असल्याने मला प्रचंड दडपण आलं होतं. पण शूटिंग सुरू झाल्यावर इतर सर्व कलाकारांनी मला खूप सांभाळून घेतलं. दोन मित्रांच्या आयुष्यात मुलगी आल्यावर ज्या घटना घडतात त्या घडण्यामागे कारणीभूत असलेल्या मुलींचे पात्र मी आणि नेहा महाजनने साकारले आहे.- गौरी नलावडे, अभिनेत्री