Join us  

...तर हिरांमडीमध्ये मनिषाच्या भूमिकेत दिसली असती रेखा; भन्साळींनी १८ वर्षांपूर्वीच अभिनेत्रीला दिलेली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 2:00 PM

९० च्या दशकामध्ये आपल्या अदाकारिने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला.

Heeramandi : ९० च्या दशकामध्ये आपल्या अदाकारिने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. हिरामंडीमध्ये मनिषा कोईरालाने मल्लिकाजान ही भूमिका साकारली आहे. अभिनेत्री मनीषा कोयराला या वेबसीरीजच्या माध्यमातून नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आली आहे. परंतु या भूमिकेसाठी मनिषा नाही तर या रेखा यांच्या नावाला दिग्दर्शकांची पसंती होती.  

'हीरामंडी'च्या मल्लिकाजानचा रोल निर्मात्यांनी जवळपास १८-२० वर्षांपूर्वी रेखा यांना ऑफर करण्यात आला होता. रेखा यांचा आधी 'हीरामंडी'तील मुख्य भूमिकेसाठी विचार केला गेला होता. इतकंच नाही गेल्या १८ वर्षांपासून त्यांच्या डोक्यात हीरामंडी हा प्रोजेक्ट होता. असा खुलासा अभिनेत्री मनीषा कोइरालाने एका मुलाखती दरम्यान केला.

फिल्मीज्ञानला दिलेल्या एका मुलाखतीत मनीषा कोयरालाने यावर भाष्यं केल्याचं पाहायला मिळालं. रेखा यांना १८ ते २० वर्षापूर्वी मल्लिकाजानच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. '' जेव्हा रेखा यांनी संजय लीला भन्साळींचा हीरामंडी पाहिली  तेव्हा त्यांनी भन्साळींकडे संपर्क साधला. आनंद व्यक्त करत त्या म्हणाल्या की मला वाटत होतं माझ्यासारखंच कोणीतरी असेल जे हे पात्र उत्तमरित्या साकारू शकेल.''

यापुढे त्या म्हणाल्या, ''रेखा यासारख्या दिग्गज अभिनेत्रीकडून आशीर्वाद मिळणं माझ्यासाठी खूप काही आहे. इतकंच नाही तर रेखा यांनी केलेल्या स्तुतीनंतर मनीषाने त्यांचे आभार देखील मानले.'' 

मल्टीस्टारर असलेल्या या सीरिजमध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख, रिचा चड्डा, शर्मिन सहगल, शेखर सुमन, फरदीन खान, अध्ययन सुमन यांची सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहे.

टॅग्स :मनिषा कोईरालारेखासंजय लीला भन्साळीसोनाक्षी सिन्हारिचा चड्डा