Join us

खिलाडी अक्षय कुमारच्या "गोल्ड" सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

By admin | Updated: July 3, 2017 09:27 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी ""गोल्ड"" सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी ""गोल्ड"" सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. अक्कीनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ""गोल्ड"" सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. 
 
""गोल्ड सिनेमाचा पहिला दिवस, नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम आणि शुभेच्छा हव्या आहेत"", असेही अक्षयनं ट्विटमध्ये लिहिले आहे. या सिनेमात अक्षय जरा हटके लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं दिसत आहे.  
 
""गोल्ड"" सिनेमाच्या निमित्तानं अक्षय कुमार पहिल्यांदा एक्सल एन्टरटेन्मेन्टचे रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरसोबत काम करत आहे. या सिनेमात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मोनी रॉयची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या सिनेमाद्वारे मोनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करत आहे.  
 
स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये लंडनमध्ये आयोजित चौदाव्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघावर आधारित या सिनेमाची कहाणी आहे. सिनेमाचं शुटिंग यावर्षातच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तर 2018 मध्ये स्वातंत्र्यादिनाच्या मुहूर्तावर ""गोल्ड"" सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकेल.
 
दरम्यान, 11 ऑगस्टला अक्षय कुमारचा "टॉयलेट एक प्रेम कथा" सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्येही अक्की सध्या व्यस्त आहे.   
 
तर दुसरीकडे,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणा-या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीला नरेंद्र मोदींच्या जीवनपटातील मोदींच्या भूमिकेसाठी अभिनेता परेश रावल आणि अभिनेते अनुपम खेर यांच्या नावाची चर्चा होती. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींच्या जीवनावर सिनेमा बनवणा-या निर्मात्यानं मोदींची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारला पसंती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदींच्या जीवनावरील सिनेमात अक्षय कुमारनं भूमिका साकारल्यास हा सिनेमा बॉक्सऑफिस गाजवेल. भाजपा नेते आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हांचीही याला सहमती असल्याची चर्चा आहे.
 
ते म्हणाले, अक्षय कुमार मिस्टर क्लीन अभिनेता आहे. त्याची प्रतिमा ही भारताच्या नव्या प्रतिमेसोबत शोभून दिसेल. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विट करत अक्षय कुमारचा सिनेमा ""टॉयलटः एक प्रेम कथा"" करमुक्त केला पाहिजे, अशी मागणी केली होती.