Join us

अपयशाची भीती वाटते : आथिया

By admin | Updated: October 26, 2016 04:32 IST

सु नील शेट्टीची मुलगी आथियाचा जेमतेम एकच चित्रपट आला आहे, मात्र आतापासूनच तिला अपयश मिळण्याची भीती वाटू लागलीय. आथियाने सलमान खान निर्मित ‘हिरो’ या

सु नील शेट्टीची मुलगी आथियाचा जेमतेम एकच चित्रपट आला आहे, मात्र आतापासूनच तिला अपयश मिळण्याची भीती वाटू लागलीय. आथियाने सलमान खान निर्मित ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर मोठा गल्ला जमावू शकला नसला तरी तो फ्लॉपही झाला नाही. पण तरीही आपल्या पहिल्या चित्रपटातून अपेक्षेनुसार यश मिळू न शकल्याचे शल्य आथियाला आहे. तसे तिने प्रामाणिकपणे कबुलही केले आहे. मी अपयशाला भीत नाही, असे म्हणणे म्हणजे माझी मीच समजूत काढण्यासारखे आहे. तू यश पचवशील, हे मला ठाऊक आहे. पण तू अपयशाचा सामना कसा करशील? असा प्रश्न माझे पप्पा (सुनील शेट्टी) मला सतत विचारत असतात. अपयशाचा सामना करताना अधिक विन्रम असावे लागते. शेवटी कलाकारांच्या आयुष्यात चढ-उतार येणारच. प्रत्येकाला याची मानसिक तयारी ठेवावी लागते, असे आथिया म्हणाली. स्टारपुत्रांना देखील बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागतो का? यावरही ती दिलखुलास बोलली. स्टारपपुत्र असल्याने सर्व प्रकारच्या लोकांना विशेषत: बॉलिवूडमधील दिग्गजांना भेटण्याची संधी मिळते. मात्र एकदा तुम्ही चंदेरी दुनियेत आलात की, कामानेच तुम्हाला तुमची ओळख निर्माण करावी लागते,असे तिने सांगितले.