Join us

फातिमाने नाकारली चित्रपटाची आॅफर!

By admin | Updated: June 11, 2017 03:04 IST

आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी फातिमा सना शेख त्याचा आगामी चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला घेऊन खूपच उत्साहित आहे.

आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी फातिमा सना शेख त्याचा आगामी चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला घेऊन खूपच उत्साहित आहे. फातिमाच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली होती. दंगलने १,७०० कोटींचा गल्ला जमावला होता. त्यामुळे आता फातिमा आपल्या करिअरला घेऊन खूपच अ‍ॅलर्ट दिसतेय. आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ मध्ये झळकण्यासाठी तिने सुशांत सिंहसोबतच्या चित्रपटाला नकार दिला आहे. फातिमा सुशांतसिंह राजपूतसोबत ‘चंदा मामा दूर के’मध्ये दिसणार होती. या चित्रपटाची स्क्रिप्ट तिने ऐकली सुद्धा. स्क्रिप्ट ऐकल्यावर तिला जाणवले की, या चित्रपटाची कथा अभिनेत्याभवतीच फिरते. चित्रपटाचा पूर्ण फोकस सुशांत सिंहवर आहे. दंगलसारख्या चित्रपटात काम केल्यानंतर फातिमा चित्रपटातील भूमिका खूप चोखंदळपणे निवडते. फातिमासह अनेक अभिनेत्रींची नावे या भूमिकेसाठी चर्चेत होती. कॅटरिना कैफ, कृती सेनन, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर याही स्पर्धेत होत्या. या भूमिकेसाठी फातिमाने स्क्रीन टेस्टही दिली. ज्यात, ती ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये योद्ध्यासारखी दिसत होती.