Join us  

प्रियंका चोप्रामुळे फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमाला लागलं ग्रहण?, अभिनेता म्हणाला-आता मी सर्व काही....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 10:51 AM

फरहान अख्तरचा 'जी ले जरा' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडला आहे. यामागील कारण पहिल्यांदाच समोर आलं आहे.

फरहान अख्तरचा 'जी ले जरा' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडला आहे. फरहानने या चित्रपटाची घोषणा केली तेव्हा चाहत्यांना खूप आनंद झाला होता, कारण या चित्रपटात कतरिना कैफ, आलिया भट आणि प्रियंका चोप्रा पहिल्यांदाच एकत्र दिसणार होत्या. मात्र त्यानंतर अशी चर्चा सुरु झाली की प्रियंका चोप्राच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे तिने या सिनेमातून काढता पाय घेतला.  त्यानंतर मात्र हा सिनेमा लांबणीवर गेला. 

आता या संपूर्ण प्रकरणावर फरहान अख्तरनं आपलं मौनं सोडलं आहे. एका मुलाखतीत फरहानने याबाबतचा खुलासा केला. फरहान म्हणाला. ''प्रियंका चोप्राच्या तारखांना घेऊन  अनेक अडचणी निर्माण होत होत्या.  अशा परिस्थितीत काय करावे हेच समजत नाही. आता मी सर्व काही नशिबावर सोडले आहे. आता हा चित्रपट कधी बनवायचा आहे, तेव्हा बनेल.. ''

प्रियंका चोप्रा तिच्या बिझी शेड्युलमुळे तिची बहीण परिणीती चोप्राच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही. प्रियंकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. प्रियंका सध्या 'हेड ऑफ स्टेट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय जॉन सीना आणि इद्रिस एल्बा देखील दिसणार आहेत.

 फरहान अख्तरबाबत बोलायचे झाले तर तोही सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याचा 'बॉम्बे मेरी जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यानंतर त्याचा 'फुक्रे ३' हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय फरहानचा बहुप्रतिक्षित डॉन 3 हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. यावेळी रणवीर सिंग या चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :फरहान अख्तरप्रियंका चोप्राकतरिना कैफ