Join us  

'मी एक स्त्री आहे आणि..'; अखेर प्रेग्नंसीच्या चर्चांवर मौन सोडत शिबानीने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 4:10 PM

Shibani dandekar: फरहान-शिबानीच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर शिबानी प्रेग्नंट असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. यावर आता शिबानीने उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (farhan akhtar) आणि शिबानी दांडेकर (shibani dandekar) यांनी अलिकडेच लग्नगाठ बांधली. १९ फेब्रुवारी रोजी या दोघांनी लग्न केलं असून अद्यापही सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. यात खासकरुन शिबानीच्या कपड्यांपासून ते तिच्या लूकपर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. विशेष म्हणजे यात अनेकांनी तिला ट्रोलदेखील केलं. फरहान-शिबानीच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर शिबानी प्रेग्नंट असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. यावर आता शिबानीने उत्तर दिलं आहे.

लग्नात शिबानीने बॉडी फिट असलेला ड्रेस निवडला होता. या ड्रेसमधून तिचं किंचितसं पोट दिसत होतं. तिचं पोट पाहिल्यावर अनेकांनी ती प्रेग्नंट असल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर ही गोष्ट वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. मात्र, या अफवा ऐकून अखेर शिबानीने तिचा एक फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हिरेजडीत ड्रेस अन् 82 हजारांची सँडल; शिबानीचा लग्नातील थाट पाहून व्हाल थक्क

अलिकडेच शिबानीने इन्स्टाग्रामवर तिचा मिरर सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिचे अॅब्स दाखवले आहेत. तसंच कॅप्शनमध्ये प्रेग्नंट नसल्याचं म्हटलं आहे. "मी एक स्त्री आणि मी प्रेग्नंट नाही. हे केवळ टकीलामुळे झालं होतं", असं शिबानीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

शिबानी हातावरील टॅटूचं अन् लग्नाचं आहे खास कनेक्शन; तुम्हाला कळला का या टॅटूचा अर्थ?

दरम्यान, 2016  पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना डेट करत होते. अखेर कुटुंबाच्या संमतीने या दोघांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. हे लग्न विविध कारणांमुळे चर्चेत राहिलं. फरहानच्या मुली या लग्नात उपस्थित होत्या म्हणून एकीकडे चर्चा रंगली. तर, फरहानची पहिली पत्नी अधुना या लग्नामुळे ट्रोल झाली. त्यामुळे हे लग्न अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलं. 

टॅग्स :शिबानी दांडेकरफरहान अख्तरबॉलिवूडसेलिब्रिटी