Join us  

सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 5:14 PM

फरहान अख्तरने एक्सेल प्रोडक्शन्सअंतर्गत नवीन सिनेमाची घोषणा केली.

मराठमोळे कलाकार बॉलिवूडमध्ये डंका गाजवत आहेत हे आता नवीन राहिलेलं नाही. यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar)  आघाडीवर आहे. 'मिमी' सिनेमासाठी तिला फिल्मफेअरही मिळाला होता. आता सई आणखी एका हिंदी सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे याच सिनेमात आपला जितू म्हणजेच जितेंद्र जोशीही (Jitendra Joshi) आहे. मोठ्या प्रोडक्शनच्या सिनेमात त्यांची वर्णी लागली आहे.

फरहान अख्तरने एक्सेल प्रोडक्शन्सअंतर्गत नवीन सिनेमाची घोषणा केली. 'अग्नी' असं सिनेमाचं टायटल आहे. 'स्कॅम' फेम प्रतीक गांधी सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. शिवाय सिनेमाची इतर स्टारकास्टही समोर आली आहे. दिव्येंदू शर्मा, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, संयमी खेर यांचीही सिनेमात भूमिका आहे. काल आंतरराष्ट्रीय फायर फायटर्स दिनानिमित्त फरहानने पोस्टर शेअर करत सिनेमाची घोषणा केली. रिअल हिरो असलेले अग्निशमन अधिकाऱ्यांवर हा सिनेमा आधारित आहे. याविषयी बोलताना सई म्हणते, "एक्सेल एंटरटेन्मेंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद होत आहे. हा सिनेमा अत्यंत वेगळा असून प्रेक्षकांना मोलाचा संदेश देणारा असणार आहे."'

सई ताम्हणकरने याआधीही एक्सेल एंटरटेन्मेंटसोबत काम केले आहे. हा तिचा या प्रोडक्शन अंतर्गत तिसरा सिनेमा आहे. त्यामुळे  हे वर्षही सईसाठी अत्यंत व्यग्र असून तिच्या करिअरला नवी दिशा देणारं आहे. तर दुसरीकडे जितेंद्र जोशीलाही या सिनेमामुळे चांगली संधी मिळाली आहे. दोघंही मराठमोळे कलाकार हिंदीतही डंका गाजवण्यास सज्ज आहेत.

टॅग्स :सई ताम्हणकरजितेंद्र जोशीबॉलिवूडफरहान अख्तर