Join us  

राधिका आपटेची अवस्था पाहून हैराण झाले चाहते, व्हायरल होतोय फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:44 AM

बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या सिने करिअरमध्ये राधिकाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान राधिकाचा सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.

बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या सिने करिअरमध्ये राधिकाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान राधिकाचा सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. 

राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती रागात दिसते आहे आणि तिच्या नाकावर पट्टी बांधलेली दिसत आहे. तिने एका हाताने केस वर पकडलेले दिसत आहेत. तिचा हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. तिची अशी अवस्था का झालीय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

राधिकाचा हा फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टमधला आहे. तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, इथे ती आहे. जगामध्ये स्वागत आहे, उमा. कान्स डायरेक्टर्स फोर्टनाइटला जाण्यापूर्वी सिस्टर मिडनाईटचा पहिला लूक. राधिकाचा हा फोटो सिस्टर मिडनाईट सिनेमातील आहे.  या चित्रपटाला कान्स सोहळ्यात स्थान मिळालं आहे.

सिस्टर मिडनाईट चित्रपटाबद्दल..

सिस्टर मिडनाईट या चित्रपटाने आता कान्समध्ये अधिकृत एन्ट्री केली असून, कान्सच्या स्पेशल सेक्शनमध्ये या चित्रपटाला स्थान मिळाले आहे. दिग्दर्शक करण कंधारीचं पदार्पण असलेला सिस्टर मिडनाईट या चित्रपटाचा फेस्टिव्हलच्या डायरेक्टर्स फोर्टनाइटमध्ये प्रीमियर होणार आहे. या चित्रपटात राधिका आपटे आणि अशोक पाठक मुख्य भूमिकेत आहेत. तसेच स्मिता तांबे आणि छाया कदमदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. वेलिंग्टन फिल्म्सच्या ॲलिस्टर क्लार्कने फिल्मगेट फिल्म्स, सीन व्हीलन आणि फिल्म आय व्हॅस्ट यांच्या सहकार्याने याची निर्मिती केली आहे. राधिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर राधिका ही नुकतीच विजय सेतुपतीचा मेरी ख्रिसमस या चित्रपटात दिसली होती.  

टॅग्स :राधिका आपटे