Join us  

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनं खरेदी केली महागडी कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 8:53 AM

महाराष्ट्राच्या लाडक्या सईसाठी वर्ष २०२४ हे खास ठरतंय.

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. सईने फक्त मराठी इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. सईने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या सईसाठी वर्ष २०२४ हे खास ठरतंय. सई ही एकापाठोपाठ एक सिनेमा आणि सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातच आता सईचं आणखी एक स्वप्न पुर्ण झालं आहे. 

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सईनं स्वतःलाच एक नवीकोरी गाडी गिफ्ट केली आहे. कलाकार मंडळींच्या आलिशान गाड्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. आपल्याकडे हक्काची गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न अभिनेत्री सईनं पाहिलं होतं. गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी केली आहे. तिनं मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी घेतली आहे. 

सईनं इन्स्टाग्रामवर गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही हे कोणालाही सांगू नका. स्वप्न पाहा, ते साध्य करा अन् ते स्वप्न जगा! असं कॅप्शन सईने व्हिडीओला दिलं आहे. सईच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह कलाकार मंडळी सईवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सईनं गाडी घेतली त्यावेळी तिची आईही उपस्थित होती. लेकीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सईची आई भावूक झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास वर्ष २०२४ ची सईनं दमदार सुरुवात केली आहे. 'भक्षक' हा हिंदी आणि 'श्रीदेवी प्रसन्न' हा मराठी असे तिचे हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही सिनेमातील तिच्या भुमिकेचं जोरदार कौतुकही झालं.  तर लवकरच सई 'डब्बा कार्टेल' या नेटफ्लिक्सच्या हिंदी सीरिजमध्येही दिसणार आहे. या वेब सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला.  सई आता पुन्हा एकदा या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी गाजवायला सज्ज झाली आहे.  

टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीकार