Join us  

संतोष घेणार एक्झिट!

By admin | Published: June 14, 2017 2:12 AM

एका मालिकेत संतोष जुवेकर यश ही भूमिका साकारत आहे. पण, काही दिवसांपूर्वी या मालिकेत त्याचा अपघात झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.

एका मालिकेत संतोष जुवेकर यश ही भूमिका साकारत आहे. पण, काही दिवसांपूर्वी या मालिकेत त्याचा अपघात झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. अपघात झाल्यापासून यश रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पण आता या मालिकेत यशचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे संतोष आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत यशची पत्नी जुई गरोदर असल्याचे काहीच दिवसांपूर्वी दाखवण्यात आले होते. जुईच्या या गोड बातमीमुळे घरातील सगळेच प्रचंड खूश होते; पण आता त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यशच्या मृत्यूची बातमी आल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता यातून जुई स्वत:ला कशा प्रकारे सांभाळते? या बातमीचा तिच्या बाळावर काही परिणाम होतो का? हे सगळे प्रेक्षकांना काहीच दिवसांत कळेल. या मालिकेत जुईची व्यक्तिरेखा मृणाल दुसानीस साकारत आहे.