Join us

किस्सा: सगळ्यांसमोर इशाने लगावली अमृता रावच्या कानशिलात; सेटवर पसरली होती शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 16:30 IST

Esha deol: अमृता सुद्धा माघार घेणारी नव्हती. तिने सुद्धा इशाला चारचौघांमध्ये शिवीगाळ केली.

बॉलिवूड अभिनेत्री इशा देओल (isha deol) सध्या तिच्या 'एक दुआ' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमाला नुकतंच ६९ व्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं. इशाने आजवर 'धूम', 'अनकही', 'कोई मेरे दिल से पूछे' यांसारख्या काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यातलाच एक सिनेमा म्हणजे 'प्यारे मोहन'. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात तिच्यासोबत अभिनेत्री अमृता रावने स्क्रिन शेअर केली होती. मात्र, या सिनेमाच्या सेटवर दोघींचं जोरदार भांडण झालं होतं. ज्यामुळे इशाने अमृताच्या कानशिलात लगावली होती. 

'प्यारे मोहन' या सिनेमात इशा देओल, अमृता राव (amrita rao), विवेक ओबेरॉय (vivek oberoi) आणि फरदीन खान (fardeen khan) हे चौघ मुख्य भूमिकेत झळकले होते. या सिनेमाचं शुटिंग सुरु असताना इशा आणि अमृता या दोघींमध्ये वादाची ठिणगी पडली. परिणामी, अमृताने इशाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अमृताचं हे वागणं सहन न झाल्यामुळे इशाने चारचौघांमध्ये तिला जोरात कानशिलात लगावून दिली. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका मुलाखतीमध्ये इशाने याविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं.

"अमृताने डायरेक्टर इंद्र कुमार आणि कॅमेरामॅन यांच्यासमोर माझ्याशी भांडण केलं. चुकीच्या पद्धतीने ती वागली मला तिचं हे वागणं जराही पटलं नाही. माझा आत्मसन्मान आणि प्रतिमा यांना धक्का लागू नये यासाठी मी रागाच्या भरात तिच्या कानशिलात लगावली. आणि, तिला मारल्यामुळे मला कोणताही पश्चातापही होत नाही. कारण, तिची तीच योग्यता आहे", असं इशा म्हणाली.पुढे ती म्हणते, "त्यावेळी मी जे केलं ते तिच्या वागणुकीमुळेच केलं होतं त्यामुळे मला या गोष्टीचा पश्चाताप होत नाही. मी फक्त माझा सेल्फ रिस्पेक्ट जपला. या घटनेनंतर अमृताने माझी माफी मागितली. मी सुद्धा तिला माफ केलं. आता आमच्यात कोणतेही मतभेद किंवा नाराजी नाही."

टॅग्स :इशा देओलअमृता रावविवेक ऑबेरॉयफरदीन खान