Join us  

Video : सो क्यूट! काजल अग्रवालने मुलाचा चेहरा दाखवला, सहा महिन्यांनी झाली स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 9:34 AM

अनेकदा ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. परंतु तिनं त्याचा चेहरा दाखवला नव्हता.

Kajal Aggarwal son Neil Kitchlu: काजल अग्रवालने अखेर तिचा मुलगा नीलची झलक दाखवली आहे. काजल अग्रवाल शुक्रवारी तिचा पती गौतम किचलू आणि नीलसोबत विमानतळावर दिसली. तिघेही विमान पकडण्यासाठी मुंबई विमानतळावर आले असताना स्पॉट झाले. काजल अधूनमधून इंस्टाग्रामवर नीलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र, ती आपल्या मुलाचा चेहरा दाखवण्याचे टाळत असल्याचे दिसून आले होते.

आई झाल्यानंतर काजल कमल हसनसोबत तिच्या कमबॅक चित्रपट इंडियन 2 मध्ये काम करत आहे. या चित्रपटासाठी ती घोडेस्वारी, तलवारबाजी आणि कलारीपयट्टूचा सराव करत आहे. नुकताच काजलने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये, तो जिममध्ये आपल्या ट्रेनरसोबत कलारीपयट्टूचा सराव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये काजलने ब्लॅक कलरचा टँक टॉप घातलेला दिसत आहे. स्टिक फायटिंग, स्वर्ड फायटिंग आणि सोबतच कलारीपयट्टून ट्रेनिंगसाठी स्ट्रेचिंग आणि कॉम्बॅट ट्रेनिंग करतानाही ती दिसत आहे.

१९ एप्रिल रोजी काजल अग्रवालनं गोंडस बाळाला जन्म दिला. तिचा पती गौतम किचलू यानं सोशल मीडियाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली होती. त्यानं यासोबत एक फोटोही शेअर केला होता. काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांचा विवाह ३० ऑक्टोबर २०२० रोजी झाला होता.
टॅग्स :काजल अग्रवालबॉलिवूड