Join us
Daily Top 2Weekly Top 5

"२५ लाखांची प्राइज मनी मिळालीच नाही" बिग बॉस विजेता एल्विश यादवचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:57 IST

बिग बॉस फेम शहनाज गिलच्या युट्यूब चॅनलवर एल्विश आला होता.

ब्लॉगर आणि इंटरनेट सेन्सेशन एल्विश यादव (Elvish Yadav) नुकताच बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता झाला. एल्विशने बिग बॉसमध्ये वाईल्ड एंट्री घेतली होती. विजेता ठरल्यानंतर त्याचा भाव चांगलाच वधारला आहे, नुकतंच त्याचं 'हम तो दिवाने' हे गाणं रिलीज झालं ज्याची सध्या खूपच क्रेझ आहे. उर्वशी रौतेलासोबत एल्विश या गाण्यात झळकला आहे. तर शहनाझ गिल आणि ईशा गुप्तासोबतही त्याने यावर रील्स शूट केले आहेत. नुकतंच एल्विशने शहनाज गिलच्या युट्यूब चॅनलवर हजेरी लावली. यावेळी त्याने बिग बॉसची प्राईज मनी मिळालीच नसल्याचा खुलासा केला.

बिग बॉस फेम शहनाज गिलच्या युट्यूब चॅनलवर एल्विश आला होता.  यावेळी तो म्हणाला,'मला आधी वाटायचं की वाईल्ड कार्ड एंट्रीला विजेतेपद दिलं जाणार नाही असा नियम असेल. जेव्हा मला एंट्री मिळाली तेव्हा मी त्यांना कमीत कमी शंभर वेळा विचारलं ती भाई, नक्की वोटच आहेत ना? मला आशा आहे की असा काही नियम नसेल की वाईल्ड कार्डमध्ये वोट मिळूनही तो तो जिंकू शकत नाही. तेव्हा ते मला म्हणाले की वोट मिळाले तर वाईल्ड कार्डही जिंकेल.'

यानंतर शहनाजने एल्विशला तिसरा मोबाईल कधी घेणार असं विचारलं तर तो म्हणाला,'माझ्याकडे तीन मोबाईल आधीच आहेत. आता बिग बॉसचे २५ लाख मिळाले की चौथा मोबाईलही घेणार'. म्हणजेच एल्विशला अद्याप प्राईज मनी मिळालीच नाही. यावर शहनाज म्हणाली, 'हे तर चुकीचं आहे'.

एल्विश यादव पहिला वाईल्ड कार्ड विजेता आहे. फिनाले एपिसोड नंतर दावा करत तो म्हणाला की मी केवळ १५ मिनिटात २८ कोटी वोट मिळवले आहेत. तो जिंकेल की नाही यावर त्याला संशयच होता.

टॅग्स :बिग बॉसशेहनाझ गिल