Join us  

'दृश्यम'मधील अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक होणार आई, फ्लॉन्ट केला बेबी बम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 10:44 AM

दृश्यम' चित्रपटातील अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलगी लग्नाच्या सहा वर्षानंतर आई होणार आहे.

अजय देवगण(Ajay Devgn)सोबत 'दृश्यम' चित्रपटात अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री इशिता दत्ता(Ishita Dutta)चा आनंद सध्या सातव्या गगनावर आहे. खरंतर ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. ही बातमी तेव्हा समोर आली जेव्हा अभिनेत्री अलिकडेच पापाराझींसमोर तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. इशिताच्या लग्नाच्या 6 वर्षांनंतर आई होणार आहे. 

इशिताने फ्लॉन्ट केला बेबी बम्पसोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीने ब्राऊन कलरचा ड्रेस घातलेला दिसत आहे आणि ती हसत हसत पापाराझींसाठी पोझ देत आहे. या ड्रेसमध्ये तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसत होता. यानंतर अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

इशिताने बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता वत्सल सेठसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांनी 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली असून हे कपल आई-वडील होणार आहेत. यामुळेच या बातमीने इशिता आणि वत्सल खूप खूश दिसत आहेत. इशिता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. जो 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या दोन्हीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

इशिता 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. ज्यांच्या हातात तब्बूच्या मुलाचा खून होतो. या चित्रपटातील इशिताचा अभिनय खूप आवडला होता. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. जिथे ती तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. 

टॅग्स :दृश्यम 2अजय देवगण