Join us  

एकाही दागिन्याशिवाय बप्पी लहरी कसे दिसायचे माहितीये का? मग पाहा 'हा' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:48 AM

Bappi Lahari: बप्पी लहरी यांनी ज्याप्रमाणे गायनाची आवड होती. त्याचप्रमाणे त्यांना सोन्याचीही तितकीच आवड होती.

संगीत कलाविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार म्हणजे बप्पी लहरी. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाच्या जोरावर बप्पी लहरी (Bappi Lahari) यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. मात्र, ७० च्या दशकात बॉलिवूडला डिस्को आणि रॉक म्युझिकची ओळख करुन देणाऱ्या बप्पी लहरी यांचं बुधवारी निधन झालं. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत.

बप्पी लहरी यांनी ज्याप्रमाणे गायनाची आवड होती. त्याचप्रमाणे त्यांना सोन्याचीही तितकीच आवड होती. विशेष म्हणजे ते अंगावर प्रचंड सोनं परिधान करायचे त्यामुळे त्यांना गोल्ड मॅन या नावानेही ओळखलं जायचं. बप्पी लहरी केवळ अंगावरच सोनं परिधान करत नव्हते. तर, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींमध्येही ते सोन्याचा वापर करायचे. खास सोन्याची आवड म्हणून त्यांनी चहा पिण्यासाठी एक सोन्याचा टी सेटही तयार करुन घेतला होता. 

बप्पी लहरींनी सोन्यासह 'या' गोष्टींमध्येही केली होती आर्थिक गुंतवणूक; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती 

बप्पी लहरी यांना चाहत्यांनी कायम सोन्याच्या दागिन्यांनी मढलेलंच पाहिलं आहे. मात्र, एकाही दागिन्याशिवाय ते कसे दिसत असतील याची कोणी कल्पना केली आहे का? सध्या सोशल मीडियावर बप्पी लहरी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते एकही दागिना परिधान न करता दिसत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या बप्पी लहरी यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे अनेक फोटो शेअर केले होते. यात त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ते यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या क्षणापर्यंत अनेक फोटोंचा समावेश आहे. यामध्येच त्यांनी त्यांचे काही असे फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांच्या अंगावर एकही दागिना नसल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :बप्पी लाहिरीबॉलिवूडसेलिब्रिटी