Join us  

'रंग माझा वेगळा' मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदार आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 1:35 PM

Rang Maza Vegla या मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदार हा त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला रसिकांची चांगलीच पसंतीस पात्र ठरत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या 'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.ही मालिका रसिकांच्या चांगलीच पसंतीस पात्र ठरत आहे. समाजातील एका वेगळ्या मानसिकतेवर आधारित ही मालिका सर्वांचं मन जिंकत आहे.या मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदार हा त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला रसिकांची चांगलीच पसंतीस पात्र ठरत आहे.या मालिकेआधी आशुतोष तुला पाहते रे मालिकेत झळकला होता. जयदीप सरंजामेही भूमिका त्याने साकारली होती.या मालिकेमुळेच तो खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. सोशल मीडियावरही आशुतोषचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो. 

मुळात महाविद्यालयीन जीवनापासूनच आशुतोषला अभिनयाची आवड होती. त्यावेळी अनेक एकांकिकामध्ये त्याने सहभाग घेतला होता. संगीत कोणे एके काळी, बत्ताशी, सवाई यासारख्या एकांकिकेचे सादरीकरण केले. त्यापैकी बत्ताशी या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक मिळालं. 'भाऊचा धक्का', 'युनो' यासारख्या शॉर्ट फिल्मचाही तो भाग बनला. 

'ओ वुमनिया', 'डोन्ट वरी बी हॅपी' आणि भरत जाधवसोबत 'मोरूची मावशी' या नाटकातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. आशुतोषने वडिलांच्या  पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.त्यामुळे आशुतोषच्या रक्तातच अभिनय आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणा नाही. त्याचे वडिल हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत.विजय गोखले यांचा आशुतोष हा लेक. विजय गोखले यांनी विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून रसिकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. त्यांची भूमिका असलेली 'श्रीमान श्रीमती' ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान हिट ठरली. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले. 

सालीने केला घोटाळा, ही पोरगी कोणाची, पोलिसाची बायको यासारख्या अनेक सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या.दम असेल तर, भरत आला परत या सिनेमात अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ‘दम असेल तर’ मध्ये त्यांनी लेक आशुतोष यालाही अभिनयाची संधी दिली होती.

टॅग्स :विजय गोखलेआशुतोष गोखले