Join us

दिव्यांका-शरदचे ब्रेकअप

By admin | Updated: March 4, 2015 23:00 IST

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांचे ब्रेकअप झाले आहे. मागील काही दिवसांपासून बातम्या येत होत्या, की दोघे विभक्त झाले आहेत.

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांचे ब्रेकअप झाले आहे. मागील काही दिवसांपासून बातम्या येत होत्या, की दोघे विभक्त झाले आहेत. परंतु आता स्वत: दिव्यांका आणि शरद यांनी या बातमीला पुष्टी दिली आहे. शरद आणि दिव्यांका यांचे गेल्या ७ वर्षांपासून नाते होते. त्यांनी आपल्या मेसेजमध्ये आम्ही सामंजस्याने विभक्त होत आहोत, याचे आम्हाला खूप दु:ख आहे. आमचे खासगी आयुष्य खासगीच राहू द्यावे, असेही दोघांनी म्हटले आहे.