Join us  

आता खूप झाले..! अनुभव सिन्हा, हंसल मेहतांनी दिला बॉलिवूडचा राजीनामा, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:12 AM

संतापलेल्या बॉलिवूड दिग्दर्शकांचा मोठा निर्णय

ठळक मुद्देबॉलिवूड सोडण्याचा अर्थ काय? बॉलिवूडचा राजीनामा दिल्यानंतर अनुभव सिन्हा, सुधीर मिश्रा व हंसल मेहता  चित्रपट बनवणार नाहीत का? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये बरेच काही बदलले आहे. केवळ नेपोटिजमवरच चर्चा होतेय, असे नाही तर प्रत्येक सेलिब्रिटीवर चाहत्यांची नजर आहे. कोण कोणाचे समर्थन करतो, कोण कोणत्या मुद्यावर काय बोलतोय, यावर चाहते रिअ‍ॅक्ट होत आहे. मात्र या वादाचे किंवा संतापाचे कारण एकच आहे ते म्हणजे बॉलिवूड. अशात बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी एक मोठा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला आहे. होय, अनुभव सिन्हा यांनी बॉलिवूडचा राजीनामा दिला आहे.

एकार्थाने ही एक मोहिम आहे आणि आता बॉलिवूडचे आणखी लोकही या मोहिमेशी जुळत आहेत. ‘आता खूप झाले. मी बॉलिवूडचा राजीनामा देतोय,’ असे  ट्वीट अनुभव सिन्हा यांनी केले. यासोबतच त्यांनी त्यांचे  ट्वीटर प्रोफाईलही बदलले. या प्रोफाईलमध्ये त्यांनी आपल्या नावासमोर ‘नॉट बॉलिवूड’ असे लिहिले.

यांनीही केले समर्थन

अनुभव सिन्हांच्या या नव्या मोहिमेला दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनीही पाठींबा दिला. ‘बॉलिवूड काय आहे? मी तर त्या सिनेमाचा भाग बनायला आलो होतो जिथे सत्यजीत रे, राज कपूर, गुरूदत्त, विमल रॉय, जावेद अख्तर सारखे लोक काम करतात. मी नेहमी अशाच लोकांच्या इंडस्ट्रीचा भाग असणार आहे,’ असे  ट्वीट सुधीर मिश्रा यांनी केले.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही काहीसा असाच सूर आळवला. ‘मी सुद्धा बॉलिवूड सोडले आहे. मात्र बॉलिवूड तसेही कधीच अस्तित्वात नव्हते,’ असे अनुभव सिन्हांनी म्हटले.

काय आहे मोहिम

बॉलिवूड सोडण्याचा अर्थ काय? बॉलिवूडचा राजीनामा दिल्यानंतर अनुभव सिन्हा, सुधीर मिश्रा व हंसल मेहता  चित्रपट बनवणार नाहीत का? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला. पण असे नाही. खुद्द अनुभव सिन्हा यांनी याबाबत खुलासा केला. मी बॉलिवूड सोडतोय. मात्र हिंदी सिनेसृष्टीत राहून चित्रपट बनवणार, असे त्यांनी लिहिले. याचा अर्थ बॉलिवूड हा शब्द अनुभव सिन्हा व अन्य दिग्दर्शकांनी त्यागला आहे.

टॅग्स :बॉलिवूडसुधीर मिश्रा