Join us

दिशा म्हणते, ‘मला हाच हिरो हवा!’

By admin | Updated: May 27, 2017 02:01 IST

‘एम. एस. धोनी : दि अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री दिशा पटनी हिच्या हाताला सध्या काम नाहीये

‘एम. एस. धोनी : दि अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री दिशा पटनी हिच्या हाताला सध्या काम नाहीये. ‘एम. एस. धोनी : दि अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात ती सुशांतसिंह राजपूतच्या आॅपोझिट दिसली. तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. यानंतर नाही म्हणायला इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’ मध्ये दिशाची वर्णी लागली. यानंतर दिशाची डीमांड अर्थातच वाढली. पण म्हणतात ना, काहींच्या डोक्यात हवा लवकरच शिरते ते. चांगल्या आॅफर्स स्वीकारण्याचे सोडून दिशा म्हणे अलीकडे अ‍ॅटिट्यूड दाखवू लागली आहे. ‘मला हाच को-स्टार हवा,’ अशी मागणी करू लागली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या तशीच चर्चा आहे. दिशाचे स्किल पाहून अनेक निर्मात्यांनी, मेकर्सनी तिच्याशी संपर्क साधला; पण तिची डीमांड लिस्ट पाहून सगळेच चाट पडले. रणबीर कपूर, रणवीरसिंह, वरुण धवन किंवा टायगर श्रॉफ यांपैकी कुणी हिरो असेल तर मी काम करण्यास इंटरेस्टेड आहे, असे दिशाने या सगळ्यांना सुनावले. यांपैकी कुणी नसेल तर दिशा म्हणे, स्क्रिप्ट ऐकायलाही राजी नाही. दिशाचे नाव अनेक चित्रपटांसाठी चर्चेत आहे.