Join us

हिट-फ्लॉपवरून भिडले दिग्दर्शक

By admin | Updated: January 13, 2016 02:33 IST

हिंदीमध्ये एक म्हण आहे, की ‘एक नाई को कभी दूसरे नाई की दुकान पसंद नहीं आती!’ याचप्रमाणे बॉलीवूडमध्ये एखादा सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेव्हा आपल्या बॅनरमध्ये

हिंदीमध्ये एक म्हण आहे, की ‘एक नाई को कभी दूसरे नाई की दुकान पसंद नहीं आती!’ याचप्रमाणे बॉलीवूडमध्ये एखादा सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेव्हा आपल्या बॅनरमध्ये दुसऱ्या दिग्दर्शकाला चित्रपट बनविण्याची संधी देतो, अशावेळी अनेकदा त्यांच्यात क्रिएटिव्ह डिफरन्सेस निर्माण होतात आणि चित्रपट बॉक्स आॅफीसवर फ्लॉप होतो. असे घडल्यास एक दुसऱ्याला जबाबदार ठरविले जाते. बॉलीवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. काही वर्षांपूर्वी स्वर्गीय दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी त्यांच्या पीएमपी (प्रकाश मेहरा प्रोडक्शन्स) मध्ये हैरी बैवेजाला दिग्दर्शक म्हणून साईन केले. जे स्वत: त्या काळातल मोठे दिग्दर्शक होते आणि आपल्या बॅनरमध्ये अजय देवगनसोबत दिलवाले आणि दिलजले चित्रपट तयार करून प्रसिद्ध झाले होते. हैरीने रेखा, नसीरुद्दीन शाह आणि अरशद वारसी यांना घेऊन मेरी बीवी का जवाब नहीं हा चित्रपट बनवला, परंतु तो चित्रपट बॉक्स आॅफीसवर सुपर फ्लाप ठरला. यानंतर प्रकाश मेहरा आणि हैरी बैवेजा यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. दुसऱ्या दिग्दर्शकांना संधी देण्याच्या नावावर शो मॅनच्या नावाने ओळले जाणारे सुभाष घई यांनी त्या काळातील दिग्दर्शक मुकुल एस़ आनंद यांना आपल्या मुक्ता आर्ट्समध्ये चित्रपट तयार करण्यासाठी साइन केले होते. घई आणि मुकुल आनंदच्या टीमने संजय दत्त, जैकी श्राफ आणि शाहरुख खान यांच्यासोबत त्रिमूर्तीचा सेटअप तयार केला होता. हा त्या काळातली मल्टीस्टार चित्रपट होता. परंतु संजूबाबा कारागृहात गेला आणि त्याच्या जागी अनिल कपूर आला. परंतु हा चित्रपटही चालला नाही आणि घई आणि मुकुल आनंद यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध झाले. असाच प्रयोग राकेश रोशन यांनीसुद्धा केला. आपल्या कंपनीत अनुराग बसू यांना घेऊन काइट चित्रपट तयार केला. हृतिक रोशन यांना अंतरराष्ट्रीय स्तरावर लाँच करण्याच्या इराद्याने चित्रपटासाठी राकेश रोशन यांनी पाण्यासाराखा पैसा खर्च केला. मात्र काइट बॉक्स आॅफीसवर कटी पतंग राहिला. याचा दोष राकेश रोशन यांनी अनुराग बसू यांच्यावर ढकलल्याने अनुराग आणि राकेश रोशन यांच्यातही जोरदार वाद झाला.

-  anuj.alankar@lokmat.com