Join us  

दिलीप कुमार यांच्या कोल्हापुरातील वास्तव्याला मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 12:10 PM

Dilip kumar Kolhapur : अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांनी भूमिका केलेल्या राम और श्याम आणि गोपी या चित्रपटांच्या चित्रीकरणानिमित्त्ताने कोल्हापूर आणि पन्हाळगडावरील चित्रीकरणाच्या तसेच त्यांच्या वास्तव्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. कोल्हापूर आणि पन्हाळ्यातील ज्येष्ठ नागरिक, कलाकारांनी दिलीप कुमार यांच्या या चित्रीकरणाच्या आठवणी जतन केल्या आहेत.

ठळक मुद्देदिलीप कुमार यांच्या कोल्हापुरातील वास्तव्याला मिळाला उजाळापन्हाळ्यात राम और श्याम, गोपी चित्रपटाचे झाले होते चित्रीकरण

संदीप आडनाईककोल्हापूर : अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांनी भूमिका केलेल्या राम और श्याम आणि गोपी या चित्रपटांच्या चित्रीकरणानिमित्त्ताने कोल्हापूर आणि पन्हाळगडावरील चित्रीकरणाच्या तसेच त्यांच्या वास्तव्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. कोल्हापूर आणि पन्हाळ्यातील ज्येष्ठ नागरिक, कलाकारांनी दिलीप कुमार यांच्या या चित्रीकरणाच्या आठवणी जतन केल्या आहेत.पन्हाळा येथील डॉ. राज होळकर तसेच कोल्हापुरातील शाहीर राजू राऊत, जी. कांबळे यांचे चिरंजीव अशोक आणि बबन कांबळे, यशवंत भालकर यांचे चिरंजीव संग्राम भालकर यांनी त्यांच्या कोल्हापूर परिसरातील आठवणींना उजाळा दिला.अभिनेते दिलीप कुमार यांचा १९६७मध्ये सुपरहिट झालेला राम और श्याम आणि १९७०मध्ये प्रदर्शित झालेल्या गोपी या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण पन्हाळा येथील राजवाड्यात, सोमेश्वर तलाव, जकात नाका, मेन रोड, पन्हाळा बसस्थानक या परिसरात जवळपास दोन महिने सुरु होते. होळकर यांच्या तबक उद्यानासमोरील विस्तीर्ण घराच्या परिसरात राम और श्याम चित्रपटाच्या संपूर्ण युनिटचे दोन महिने वास्तव्य होते. यावेळच्या आठवणीही होळकर यांनी सांगितल्या.यांनी केल्या होत्या भूमिकाराम और श्याम आणि गोपी चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत कोल्हापुरातील अनेक कलाकारांनीही भूमिका केल्या होत्या. दिवंगत अभिनेत्री सरोज सुखठणकर यांनी राम और श्याममध्ये काम केले होते.गोपी चित्रपटातील एका दृश्यात दिलीप कुमार यांच्यासोबत काम केल्याची आठवण डॉ. राज होळकर, बहीण इरा आणि त्यांचे वडील जॉन होळकर यांनी सांगितली. कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील बालेचांद यांनीही गोपीमध्ये तर ज्येष्ठ पत्रकार वसंत सूर्यवंशी यांनी मशाल चित्रपटात भूमिका केल्याची आठवण शाहीर राजू राऊत यांनी सांगितली.जयप्रभापुढे झाले नतमस्तकचित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओला दिलीप कुमार यांनी कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता भेट दिली. भालजींची परवानगी घेत त्यांनी जयप्रभा स्टुडिओमध्ये प्रवेश केला आणि वाकून नमस्कार केला. भालजींनीही त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या खांद्याला हात लावून उभे केले. तेव्हा समोर खुर्चीवर न बसता त्यांनी बाबांसमोर मांडी घालत एका छोट्याशा रोलची विनवणी केली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची आठवण या घटनेचे साक्षीदार दिवंगत चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी त्यांच्या ह्यमला भेटलेली मोठी माणसंह्ण या पुस्तकामध्ये सांगितली आहे.फोटोग्राफर्स असोसिएशनला दिली भेटदिलीप कुमार सायराबानूंसह कोल्हापूरमध्ये १९६६मध्ये जेव्हा आले होते, तेव्हा त्यांनी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, एम. बी. लोहिया यांच्यासमवेत कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स को. ऑप असोसिएशनला भेट दिली. त्यावेळी संस्थेचे तत्कालीन संचालक व सभासदांसोबत छायाचित्र काढले होते. याचवर्षी ते मेढे तालमीच्या आणि तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. उर्दूमिश्रीत हिंदीमध्ये त्यांनी संवाद साधला होता.चिपळ्यांऐवजी वापरले टाळ, लाठीकाठीचे मिळाले प्रशिक्षणगोपी चित्रपटात रामचंद्र कह गये सियासे या गाण्याच्या चित्रीकरणप्रसंगी दिलीप कुमार यांना चिपळ्यांचा वापर करायचा होता, मात्र त्या न मिळाल्याने टाळ वापरण्यात आल्याची तसेच काही हाणामारीच्या दृश्यांसाठी त्यांना लाठीकाठीचे प्रशिक्षण कोल्हापुरातील मर्दानी आखाड्यातून देण्यात आल्याची माहिती शाहीर राजू राऊत यांनी दिली.जी. कांबळे यांच्याबद्दल आदरकोल्हापूरचे चित्रकार जी. कांबळे यांनी गाजलेल्या मुघल ए आझम यासह इन्सानियत, नया दौर या चित्रपटांची पोस्टर्स केली होती. के. असिफ यांनी अंधेरीतील मोहन स्टुडिओत जी. कांबळे यांच्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ दिला होता. इतकेच नव्हे तर दिलीप कुमारसोबत सोवळेकरीही वेगळा दिला होता. त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्टुडिओत व्यवस्था केली होती. या काळात त्यांच्या कन्या अंजनाचा दिलीप कुमार यांना चांगला लळा लागला होता. घरात तयार होणारी पुरणपोळी, अळूची भाजी, करंज्या, दिवाळीचा फराळ ते मागून घेत. ह्यदादासाहेब फाळके पुरस्कारह्ण मिळाला तेव्हा जी. कांबळे यांची आठवण त्यांनी काढत त्यांच्यासारखा कलाकार होणे नाही, असे म्हटल्याची आठवण अशोक कांबळे यांनी सांगितली. 

टॅग्स :दिलीप कुमारकोल्हापूर