Join us  

'ट्रॅजेडी किंग' झाले 95 वर्षांचे, पत्नी सायरा बानू यांनी ट्विट करून मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 9:15 AM

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज 95 वा वाढदिवस आहे.

ठळक मुद्दे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज 95 वा वाढदिवस आहे. दिलीप कुमार यांचा हा वाढदिवस खास करण्यासाठी दिलीप कुमार यांची पत्नी तसंच ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी खास गेट टुगेदरचं आयोजन केलं आहे.

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज 95 वा वाढदिवस आहे. दिलीप कुमार यांचा हा वाढदिवस खास करण्यासाठी दिलीप कुमार यांची पत्नी तसंच ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी खास गेट टुगेदरचं आयोजन केलं आहे. घरातील मंडळी आणि जवळची मित्र मंडळी या खास कार्यक्रमात हजर असतील. दिलीप कुमार यांना अलिकडेच न्यूमोनिया झाला होता. डॉक्टर्सनी त्यांना इन्फेक्शनपासून बचाव करण्याचा सल्ला दिला होता, परिणामी त्यांचा वाढदिवस दरवर्षा सारखा यावर्षी साजरा केला जाणार नसल्याची माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी टि्वटरवरून दिली. घरातील मंडळींसाठी यंदा वाढदिवस असेल, असं सायरा बानो यांनी म्हंटलं आहे.

 

दिलीप कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम असून त्यांचे भाऊ, बहिणी, नातेवाईक आणि काही जवळचे मित्र दिलीप कुमार यांना शुभेच्छा देण्यासाठी येतील. दिलीप कुमार यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या त्यांच्या सगळ्या चाहत्यांचे धन्यवाद. असं ट्विटव सायरा बानू यांनी दिलिप कुमार यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे. दिलिप कुमार यांचा वाढदिवस दरवर्षी कसा साजरा केला जातो? हे सुद्धा सायरा बानू यांनी सांगितलं आहे. 

 

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचं निवासस्थान विविध रंगांच्या फुलांनी सजवलं जातं. घराला एक वेगळं रूप दिलं जातं, अशी माहिती सायरा बानू यांनी दिली. दरवर्षी दिलीप कुमार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं निवासस्थान नातेवाईक व मित्रमंडळीसाठी दिवसभर खुलं असतं. दिलीप कुमार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होते.पण यंदा दिलीप कुमार आजारी असल्याने त्यांना कुठलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून वाढदिवस सेलिब्रेशनवर बंधन आहेत, असंही सायरा बानू यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आगे. 

गेल्या काही महिन्यांपासून दिलीप कुमार यांची प्रकृती ठिक नाहीये. 2 ऑगस्ट रोजी दिलिप कुमार यांना किडनीच्या त्रासामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

 

'ट्रॅजेडी किंग' अशी ओळख असणाऱ्या दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयाच्या शैलीने सगळ्यांनाचा वेड लावलं आहे. आजही त्यांचे सिनेमे आवडीने पाहिले जातात. त्यांनी 65 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. देवदास '(1955), नया दौर  (1957), मुघल-ए-आझम (1960), गंगा-जमुना (1961), क्रांती  (1961) आणि कर्मा  (1986) हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. दिलीप कुमार यांचां 1994 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. 2015 साली दिलीप कुमार यांना पद्माविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

टॅग्स :दिलीप कुमार