Join us

तारक मेहता या मालिकेत जेठालालला ऑफर करण्यात आली होती ही भूमिका, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 18:07 IST

दिलीप जोशीला जेठालाल या भूमिकेआधी या मालिकेतील एका वेगळ्या पण महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण या भूमिकेला तो योग्य न्याय देऊ शकणार नाही असे वाटत असल्याने त्याने या भूमिकेसाठी नकार दिला.

ठळक मुद्देदिलीप जोशीनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मी चंपकलाल गडा म्हणजेच बापूजीची भूमिका साकारावी अशी मालिकेच्या टीमची इच्छा होती.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत जेठालालच्या भूमिकेत आपल्याला दिलीप जोशीला पाहायला मिळत आहे.

दिलीप जोशीने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्याआधी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे मिळाली. तुम्हाला माहीत आहे का, दिलीप जोशीला जेठालाल या भूमिकेआधी या मालिकेतील एका वेगळ्या पण महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण या भूमिकेला तो योग्य न्याय देऊ शकणार नाही असे वाटत असल्याने त्याने या भूमिकेसाठी नकार दिला.

दिलीप जोशीनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मी चंपकलाल गडा म्हणजेच बापूजीची भूमिका साकारावी अशी मालिकेच्या टीमची इच्छा होती. पण मी वयस्कर माणसाच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकणार नाही असे मला वाटत असल्याने मी या भूमिकेसाठी नकार दिला. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत बाबूजीच्या भूमिकेत आपल्याला अमित भटला पाहायला मिळत आहे. त्याने ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारली आहे. विेशेष म्हणजे खऱ्या आयुष्यात तो जेठालालपेक्षा वयाने लहान आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा