Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतल्या अभिनेत्रीची झालीय अशी अवस्था,चाहेतही चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:12 IST

अमेय वाघ, सखी गोखले, पूजा ठोंबरे, पियुष चिपळुणकर, स्वानंदी टीकेकर, सुव्रत जोशी यांसारख्या तरुण कलाकारांच्या भूमिका होत्या..

 'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली होती. या मालिकेत अमेय वाघ, सखी गोखले, पूजा ठोंबरे, पियुष चिपळुणकर, स्वानंदी टीकेकर, सुव्रत जोशी यांसारख्या तरुण कलाकारांच्या भूमिका होत्या.मालिकेतील नावाप्रमाणेच या सर्वांची छान गट्टी सेटवर जमायची. मालिका संपली असली तरी आजही मालिका आणि मालिकेतले कलाकार रसिकांच्या मनात घर करुन आहेत. सोशल मीडियावरही चाहते त्यांच्या संपर्कात असते. याच मालिकेतली अभिनेत्री स्वानंदी टीकेकर सध्या चर्चेत आहे. 

स्वानंदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे व्हिडीओ फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. पारंपरिक असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक लूक तिच्या चाहत्यांसाठी खास असायचा. मात्र आता अचानक तिच्या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.  

 

इतकंच काय तर आता तिचा लूकही पूर्णपण बदलला आहे. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या विविध अंदाजातले फोटो पाहायला मिळतील. नुकताच तिने शेअर केलेला एक फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून चाहते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. 

स्वानंदी फोटोत पूर्वीसारखी एनर्जेटीक दिसत नसल्यामुळे चाहते तिला वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसत आहेत. मुळात ती फोटोत खूपच बारिकही दिसत आहे. त्यामुळे चाहते तिला डाएटींग बंद कर असा सल्ला देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजून बारिक होवू नकोस पूर्वीसारखाच लूक तुला जास्त चांगला वाटतो. बारिक होण्याच्या नादात काय ती अवस्था अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर उमटल्याचे पाहायला मिळत आहे. काहींना तिचा हा लूक आवडला आहे तर काहींना अजिबात आवडलेला नाही. 

अनेकदा स्वतःला फिट ठेवण्याच्या नादात अभिनेत्री डाएटींग करत असल्याचे पाहायला मिळते. फिटनेस फ्रिक बनण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळत असतात. मात्र योग्य आहार न घेतल्याने सुंदर दिसणे तर सोडाच त्यांना ओळखणेही कठीण जाते. अशी इंडस्ट्रीत अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे स्वानंदीने तसे करु नये. फिट राहण्यासाठी योग्य आहार, व्यायाम नित्यनियमाने करत स्वतःची काळजी घेण्याचे चाहते तिला सांगतांना दिसत आहे. 

टॅग्स :स्वानंदी टिकेकर