Join us  

मीनाक्षी शेषाद्रीच्या लेकीला पाहिलंत का?, आलिया, सारा आणि जान्हवीला सौंदर्यात देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 2:38 PM

Meenakshi Sheshadri : मीनाक्षी शेषाद्री सध्या बॉलिवूडपासून दुरावली आहे.

दामिनी, शहेनशाह आणि घायाळ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्य आणि अभिनयाची जादू पसरवणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री(Meenakshi Sheshadri)चे आजही करोडो चाहते आहेत. मीनाक्षी शेषाद्री आज जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी एक काळ असा होता जेव्हा चाहत्यांना तिची अदा आवडायची. मीनाक्षी शेषाद्री हिचे नाव अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये गणले जाते ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अगणित सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला मीनाक्षी शेषाद्रीशी नाही तर त्यांच्या मुलीची ओळख करून देणार आहोत. मीनाक्षी शेषाद्रीच्या मुलीबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, तिची मुलगी सौंदर्यात बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

मोठ्या पडद्यावरील दामिनी म्हणजेच मीनाक्षी शेषाद्रीच्या मुलीचे नाव केंड्रा म्हैसूर आहे. केंड्रा तिच्या आईसारखी दिसायला खूप सुंदर आहे. केंड्रा बॉलीवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीसारखी अतिशय आकर्षक आणि ग्लॅमरस दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला मीनाक्षी शेषाद्रीची पूर्ण झलक पाहायला मिळणार आहे.

या फोटोत, मीनाक्षीची लाडकी केंड्रा एका आकर्षक पांढऱ्या स्ट्रॅप ड्रेसमध्ये पाहायला मिळते आहे. या स्टार किडने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी लांब पांढऱ्या रंगाचे हातमोजे घातले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर सुंदर स्मित पाहायला मिळत आहे.

मीनाक्षी शेषाद्री यांनी १९९५ मध्ये यूएस-आधारित गुंतवणूक बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केले आणि करिअरच्या शिखरावर असताना चित्रपट उद्योगातून ब्रेक घेतला. मीनाक्षी शेषाद्री अनेक बॉलीवूड हिट चित्रपट केल्यानंतर अमेरिकेत शिफ्ट झाली आणि आज ती आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे. हिरो चित्रपट मीनाक्षी शेषाद्रीच्या करिअरमधला मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटात मीनाक्षी जॅकी श्रॉफसोबत दिसली होती.

टॅग्स :मिनाक्षी शेषाद्री