Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 15:46 IST

मुंबईत शूटिंगला काही अटींसोबत परवानगी देण्यात आली आहे. काही कलाकार आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करताना दिसत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आहे. त्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. हळूहळू पुन्हा सर्व पुर्ववत होताना दिसत आहे. मुंबईत नियमांसोबत शूटिंगसाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यानंतर टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत सर्व कलाकारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. काही कलाकारांनी तर शूटिंगलाही सुरूवात केली आहे. या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचा समावेश आहे.

अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ताने बालाजी टेलिफिल्म्सचा चित्रपट गुडबायच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या दोन्ही कलाकारांनी याबद्दल इंस्टाग्रामवर सांगितले आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ते कारमध्ये बसलेले दिसत आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे त्यांमी मास्क घातलेला दिसतो आहे. त्यांनी फोटो शेअर करून लिहिले की, सकाळच्या ७ वाजता. कामावर जाण्यासाठी ड्रायव्हिंग. लॉकडाउन २.०नंतर पहिल्या दिवशी शूटिंग. पँगोलिन मास्क आणि अभिव्यक्तीः प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या पद्धतीने चांगला आणि आणखी चांगला होत चालला आहे.

तर नीना गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेरचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि लिहिलं की, पुन्हा शूटवर.

अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता पहिल्यांदाच शूटिंग करताना दिसणार आहेत. विकास बहलच्या चित्रपटात दोघे पती पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चननीना गुप्तारश्मिका मंदाना