Join us  

भाई 'कोमात'! ‘एक दिवस तुझाही पर्दाफाश होईल...’; एक्स-गर्लफ्रेन्ड सोमी अलीनं सलमान खानला दिली धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:43 PM

Somy Ali accuse Salman Khan? : सोमी अलीनं शेअर केलेली पोस्ट पाहून बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

एकेकाळी सलमान खान (Salman Khan) हा सोमी अलीच्या  (Somy Ali)  प्रेमात वेडा झाला होता. असं म्हणतात की, तिच्यासाठीच त्यानं  संगीता बिजलानीला सोडलं होतं. अर्थात इतकं करूनही सलमान-सोमीचं नातं फार काळ चाललं नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी भारत सोडून गेली ती कायमची. सोमीनंतर सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)आली. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही. असं म्हणतात की, सलमानने कथितरित्या ऐश्वर्याला मारहाण केली होती. कदाचित सोमी अलीसोबतही असंच घडलं होतं. इतक्या वर्षानंतर सोमीनं शेअर केलेली पोस्ट पाहून तरी हाच अंदाज व्यक्त केला जातोय. तिच्या या पोस्टनं सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.

सोमीची पोस्ट

सोमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने सलमान व भाग्यश्रीच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते, ‘बॉलिवूडच्या हार्वी विन्स्टीन, एक दिवस तुझाही पर्दाफाश होईल. ज्या महिलांचं तू शोषण केलंस, त्या एकदिवस समोर येतील आणि सत्य जगाला सांगतील. जसं ऐश्वर्या रायने केलं...’सोमीने या पोस्टमध्ये सलमानच्या नावाचा थेट उल्लेख केलेला नाही. पण तिचा इशारा सलमानकडेच असल्याचं स्पष्ट दिसतं. या पोस्टमध्ये तिने ऐश्वर्या रायचा देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

कोण आहे हार्वी विन्सटीन?सोमीच्या पोस्टमध्ये हार्वी विन्सटीनचा उल्लेख आहे. हा हार्वी हॉलिवूडचा मोठा निर्माता व दिग्दर्शक आहे. हार्वीने एक-दोन नाही तर अनेक महिलांसोबतगैरवर्तन केलं. यात हॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींचाही समावेश आहे. बलात्कार, मारहाण, लैंगिक शोषण, धमकी देणे असे अनेक त्याच्यावर आहेत. न्यायालयाने त्याला 23 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

सलमानने ऐश्वर्याला केली होती हात तुटेपर्यंत मारहाण?202 साली झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या रायनं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. या पुरस्कार सोहळ्यात पोहोचलेल्या ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झालेली दिसत होती आणि तिने डोळ्यांवर काळ्या रंगाचा मोठा गॉगल घातला होता. ऐश्वर्याला असं पाहूत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. सलमान खानने ऐश्वर्याला मारहाण केली असल्याची चर्चा होती. मात्र ऐश्वर्याने सलमानने अ मारहाण केल्याची चर्चा फेटाळत पायºययांवरुन घसरून पडल्यामुळे हाताला दुखापत झाल्याचा खुलासा केला होता. 

टॅग्स :सलमान खानसोमी अलीऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूड