Join us  

खरंच अभिनेता इंदर कुमारने आत्महत्या केली होती? व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 12:39 PM

सोशल मीडियात इंदर कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्या निधनावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि सिने निर्माता इंदर कुमार याचं 28 जुलै 2017 ला निधन झालं होतं. त्यावेळी इंदर कुमारचं निधन हार्ट अटॅकमुळे झालं असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण सोशल मीडियात इंदर कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्या निधनावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. 

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडीओत इंदर त्यांच्या अपयशाबद्दल दारु पिऊन बोलताना दिसत आहे. मी एक चांगला अभिनेता होऊ शकलो नाही, माझ्या ऐशो-आरामाच्या जीवनामुळे मी रस्त्यावर आलोय आणि आता मी सुसाईड करत आहे, असे तो बोलताना दिसत आहे. पण हा इंदरचा रिअल लाईफ व्हिडीओ नाहीये.  

स्पॉटबॉय डॉट कॉम च्या रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ इंदरच्या एका आगामी सिनेमातील सीनचा आहे. हा व्हिडीओ त्याने निधनाच्या काही तासांपूर्वी रेकॉर्ड केला होता. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत लवकरच इंदर कुमारची पत्नी पल्लवी एक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी