Join us

उच्चार सुधारतेय अक्षरा

By admin | Updated: January 8, 2015 23:22 IST

कमल हसन यांची छोटी कन्या अक्षरा, अमिताभ आणि धनुष यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आर. बल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करणार आहे

कमल हसन यांची छोटी कन्या अक्षरा, अमिताभ आणि धनुष यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आर. बल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करणार आहे. प्रथमच कॅमेऱ्याला सामोरी जाणारी अक्षरा आपल्या पदार्पणासाठी खूप मेहनत घेतेय. सध्या ती आपले उच्चार शुद्ध करण्यासाठी दिल्लीस्थित नाट्यदिग्दर्शक एन.के. शर्मांच्या प्रशिक्षणाला सतत हजेरी लावतेय. नुसतंच दिसणं सुंदर असून चालत नाही, तर उच्चार चांगले असतील तर टिकाव लागतो याची बहुधा तिला जाणीव झाली असावी.