Join us  

बहेन, भगवान से तो डर...! ढिंच्याक पूजाचे ‘कोरोना’ सॉन्ग ऐकून नेटकरी ‘कोमात’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:15 PM

होगा ना कोरोना....

ठळक मुद्दे ढिंच्याक पूजाच्या आधीच्या  गाण्यांनाही लोकांनी असेच ट्रोल केले होते.

सोशल मीडियावर अनेक लोक एका रात्रीत स्टार झालेत. या यादीतील असेच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा. सेल्फी मैने लेली आज, दिलो का स्कूटर आणि  आफ्रीन फातिमा बेवफा यासारख्या आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे ढिंच्याक पूजा चर्चेत आली. या गाण्यांनी अनेक रेकॉर्ड्स बनवले. सध्या हीच ढिंच्याक पूजा एक नवे गाणे घेऊन आली आहे. होय, जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. ढिंच्याक पूजाचे हे गाणेही कोरोनावर आहे. 

 ‘होगा ना करोना’ हे ढिंच्याक पूजाचे नवे गाणे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.  19 मार्चला पूजाच्या ऑफिशिअल युट्यूब पेजवर ते अपलोड करण्यात आले आहे. या गाण्याच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर सुद्धा देण्यात आला आहे. हे गाणे केवळ जनजागृतीच्या हेतूने तयार करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. ‘कोरोना कोरोना... दुओ करो किसी को ये ना होना..’ असे यात पूजा म्हणतेय.

लोकांनी घेतली मजादरम्यान ढिंच्याक पूजाच्या या कोरोना गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या गाण्यावरून पूजाची मजा घेतली आहे. ‘ये गाणा सुन के कोरोना का पक्का विनाश होगा,’ असे एका युजरने म्हटलेय. ‘हे गाणे कोरोनाला ऐकावा, तो तसाच पळून जाईल,’ अशी मजेशीर प्रतिक्रिया एकाने दिली आहे. एकाने तर ‘कान से खून निकल राहा है,’ असे म्हटले आहे. तर एकाने ‘बहेन भगवान से तो डर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

   ढिंच्याक पूजाच्या आधीच्या  गाण्यांनाही लोकांनी असेच ट्रोल केले होते. पण या गाण्यांतून ढिंच्याक पूजाने लाखोंची कमाई केली होती. लोकांनी कितीही ट्रोल केले, माझी कितीही खिल्ली उडवली तरी मी लक्ष देत नाही. मी सोशल मीडियावरच्या नकारात्मक प्रतिक्रिया मुळीच वाचत नाही. असे केल्याने नवीन गाणी सादर करण्याची माझी इच्छा कायम राहते, असे ढिंच्याक पूजा एका मुलाखतीत म्हणाली होती.

टॅग्स :ढिंच्याक पूजाकोरोना वायरस बातम्या