Join us  

जान्हवी आणि इशानला 'धडक'साठी मिळालं केवळ इतकंच मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 3:30 PM

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या जोडीच्या 'धडक' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या जोडीच्या 'धडक' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमासाठी या दोघांना किती मानधन मिळालं याची चर्चा सुरु आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'धडक' सिनेमातील स्टारकास्टचं मानधन समोर आलं आहे. या सिनेमात व्हिलन साकारलेले आशुतोष राणा यांना 80 लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे. तेच या सिनेमासाठी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी झिंगाट गाणं रिक्रिएट केलं आहे. दोघांना 1.5 कोटी रुपयांचं मानधन देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

'धडक' हा सिनेमा मराठीतील गाजलेल्या 'सैराट' चा रिमेक आहे. नागराज मंजुळे यांची ही कथा असून त्यासाठी त्यांना 2 कोटी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. तर दिग्दर्शक शशांक खेतान याने या सिनेमासाठी 4 कोटी रुपये मानधन घेतल्याचे बोलले जात आहे.

तर जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या नव्या जोडीला फारच कमी मानधन देण्यात आल्याची चर्चा आहे. या सिनेमासाठी जान्हवीला 60 लाख रुपये दिले गेल्याची माहिती आहे. या सिनेमातील स्टारकास्टच्या या मानधन प्रॉडक्शन हाऊसकडून अधिकृत काहीही सांगण्यात आलं नाहीये पण मीडियात याची चर्चा होत आहे.  

टॅग्स :धडक चित्रपटजान्हवी कपूर